Lokmat Agro >हवामान > Koyna Dam Water Level: गुडन्यूज कोयना धरणातील पाणीसाठा पोहचला इतक्या टीएमसीवर

Koyna Dam Water Level: गुडन्यूज कोयना धरणातील पाणीसाठा पोहचला इतक्या टीएमसीवर

Koyna Dam Water Level: Strong presence of rain for two days.. How many TMC of water storage in Koyna Dam | Koyna Dam Water Level: गुडन्यूज कोयना धरणातील पाणीसाठा पोहचला इतक्या टीएमसीवर

Koyna Dam Water Level: गुडन्यूज कोयना धरणातील पाणीसाठा पोहचला इतक्या टीएमसीवर

जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सोमवारपासून उघडझाप सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ तर नवजा २२ आणि महाबळेश्वरला १७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सोमवारपासून उघडझाप सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ तर नवजा २२ आणि महाबळेश्वरला १७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली.

शेअर :

Join us
Join usNext

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सोमवारपासून उघडझाप सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ तर नवजा २२ आणि महाबळेश्वरला १७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर कोयना धरणातील आवकही कमी झाली असलीतरी पाणीसाठा ४२ टीएमसीवर पोहोचलाय.

जिल्ह्यात जुलै महिना सुरू झाल्यापासून पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. तरीही पावसाची उघडझाप चिंता वाढवत आहे. शनिवार आणि रविवारी पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. कास, बामणोली, तापोळासह कोयना, नवजा, महाबळेश्वरला पावसाने झोडपले.

सातारा शहरातही जोरदार पाऊस पडला, तसेच वाई, कऱ्हाड, जावळी तालुक्यांतही पाऊस बरसला. पण, सोमवारपासून पाऊस कमी झाला आहे. त्यातच सूर्यदर्शनही घडत आहे. मंगळवारीही जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप कायम होती. अपवादात्मक स्थितीत पाऊस होत आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोयनानगर येथे ८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत १ हजार ९९० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली.

नवजा येथे आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पडला. दीड महिन्यात २ हजार ३१९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वरला आतापर्यंत १ हजार ७६९ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आवकही कमी झाली आहे.

मंगळवारी सकाळच्या सुमारास सुमारे १९ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ४२.०६ टीएमसी झालेला. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू आहे. तर सातारा शहरात ढगाळ वातावरण राहत आहे. काहीवेळा सूर्यदर्शनही घडत आहे.

Web Title: Koyna Dam Water Level: Strong presence of rain for two days.. How many TMC of water storage in Koyna Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.