Join us

Koyna Dam Water Level : कोयना धरणाचा पाणीसाठा गेला शंभर टीएमसीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 11:59 AM

कोयना धरणातील पाणीसाठ्याने शंभर टीएमसीचा टप्पा मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास पार केला आहे. धरणात १००.३८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

कोयनानगर: कोयना धरणातीलपाणीसाठ्याने शंभर टीएमसीचा टप्पा मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास पार केला आहे. धरणात १००.३८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून १२,४५५ क्युसेक विसर्ग सुरू केला आहे.

यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनाने दिला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने धरणातील पाण्याची आवक चाळीस हजार क्युसेकवर पोहोचली आहे.

धरणाच्या पाणीसाठ्यात सुमारे दहा टीएमसीने वाढ झाली आहे. परिचालन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी वीस दिवसांपूर्वी बंद केलेला पायथा वीजगृह मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता विसर्ग सुरू केला आहे.

पायथा वीजगृहाचे दोन जनित्र संचातून वीजनिर्मिती झाल्यानंतर २१०० क्युसेक व सहा वक्र दरवाजे एक फूट ३ इंचाने उचलून १०,३५५ क्युसेक असा १२ हजार ४५५ क्युसेक विसर्ग कोयना नदीत सुरू केला आहे.

कोयना धरणाच्या शिवाजीसागर जलाशयात मंगळवारी सकाळी ९८.८९ टीएमसी पाणीसाठा होता. दुपारी दोनच्या सुमारास शंभर टीएमसी पार झाला. सायंकाळी पाच धरणाचा पाणीसाठा १००.३८ टीएमसी इतका होता.

कोयना धरणातील पाणीसाठ्याने शंभर टीएमसी पार केल्याने या राज्यातील काही भागांचा सिंचन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

मागील काही वर्षांत शंभर टीएमसी पार केलेला पाणीसाठा १ सप्टेंबर २०१७१४ ऑगस्ट २०१८५ ऑगस्ट २०१९३० ऑगस्ट २०२०१० सप्टेंबर २०२१८ सप्टेंबर २०२२

टॅग्स :कोयना धरणपाणीसातारापाऊसनदीधरण