Lokmat Agro >हवामान > Koyna Dam Water Level: कोयनेची पाणीपातळी वाढली धरण भरण्यास फक्त इतक्या टीएमसी पाण्याची गरज

Koyna Dam Water Level: कोयनेची पाणीपातळी वाढली धरण भरण्यास फक्त इतक्या टीएमसी पाण्याची गरज

Koyna Dam Water Level: The water level of Koyna has increased, only so much TMC water is needed to fill the dam | Koyna Dam Water Level: कोयनेची पाणीपातळी वाढली धरण भरण्यास फक्त इतक्या टीएमसी पाण्याची गरज

Koyna Dam Water Level: कोयनेची पाणीपातळी वाढली धरण भरण्यास फक्त इतक्या टीएमसी पाण्याची गरज

'महाराष्ट्राची भाग्यरेषा' असलेल्या कोयना धरणाचा पाणीसाठा बुधवारी सकाळी ८५.५९ टीएमसीवर पोहोचला आहे.

'महाराष्ट्राची भाग्यरेषा' असलेल्या कोयना धरणाचा पाणीसाठा बुधवारी सकाळी ८५.५९ टीएमसीवर पोहोचला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोयनानगर : 'महाराष्ट्राची भाग्यरेषा' असलेल्या कोयना धरणाचापाणीसाठा बुधवारी सकाळी ८५.५९ टीएमसीवर पोहोचला आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ १९.६६ टीएमसी पाण्याची गरज आहे.

सध्या धरणातील आवकेनुसार विसर्ग सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यात कोयना सिंचन विभागाला शक्य झाले असले तरी मंगळवारी रात्रीपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने पाण्याच्या विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

गुरुवारी कोयना नदीपात्रात एकूण ३२,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाचा जोर वाढल्याने व पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पाच दिवसांनंतर मंगळवारी वक्री दरवाजाचा विसर्ग वाढवत नऊ फूट केल्याने कोयना नदीतील विसर्ग ४२,१०० क्युसेक झाला आहे.

चांदोली पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी
शिराळा तालुक्यात तसेच चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी पहाटे पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली. परिणामी वारणा, मोरणा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातील विसर्गात वाढ करण्यात आली आहे. कोकरुड व चरण मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. तालुक्यातील २१ गावांना पुराचा फटका बसला आहे.

अधिक वाचा: Ujani Dam Water: उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता पाहिजे फक्त इतकं पाणी

Web Title: Koyna Dam Water Level: The water level of Koyna has increased, only so much TMC water is needed to fill the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.