Lokmat Agro >हवामान > Kukadi Project Water: मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पात ६४.८२ टक्के पाणीसाठा

Kukadi Project Water: मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पात ६४.८२ टक्के पाणीसाठा

Kukadi Project Water: 64.82 percent water storage in Kukadi Project due to heavy rains | Kukadi Project Water: मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पात ६४.८२ टक्के पाणीसाठा

Kukadi Project Water: मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पात ६४.८२ टक्के पाणीसाठा

जून आणि जुलै महिन्याच्या विश्रांतीनंतर कुकडी प्रकल्पांतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात मागील आठवडाभरात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पात सुमारे ६४.८२ टक्के पाणी जमा झाले आहे.

जून आणि जुलै महिन्याच्या विश्रांतीनंतर कुकडी प्रकल्पांतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात मागील आठवडाभरात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पात सुमारे ६४.८२ टक्के पाणी जमा झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कांताराम भवारी
डिंभे : जून आणि जुलै महिन्याच्या विश्रांतीनंतर कुकडी प्रकल्पांतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात मागील आठवडाभरात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पात सुमारे ६४.८२ टक्के पाणी जमा झाले आहे.

डिंभे धरण शंभर टक्के भरल्याने पूरनियंत्रणासाठी धरणाच्या पाच दरवाजातून सुमारे १८,००० क्यूसेक्सने घोडनदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. एकूण कुकडी प्रकल्पातून २८,२०० क्यूसेक्सने पाणी बाहेर सोडावे लागले आहे.

घोडनदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक-१ नारायणगाव यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आजमितीस कुकडी प्रकल्पात सुमारे ६४.८२ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे.

मागील दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे कुकडी प्रकल्पांतर्गत लाभ क्षेत्रातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या भागातील शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त होत होती. खरीप आवर्तनामुळे प्रकल्पातील पाणी साठ्याने तळ गाठला होता.

मात्र, मागील आठवडाभरात कुकडी प्रकल्पातील सर्वच धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. ४ व ५ जुलैला सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने कुकडी प्रकल्पातील धरणे भरण्यास मदत झाली. पूरनियंत्रणसाठी कुकडी प्रकल्पातून २८,२०० क्यूसेकने पाणी सोडावे लागले.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस आला असून, कुकडी प्रकल्पात ६४.८२ टक्के पाणीसाठा झाला आहे. याचा फायदा तीन जिल्ह्यातील सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्राला होणार आहे. अशी माहिती पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.

कुकडी प्रकल्पात झालेला पाणीसाठा, झालेल्या पावसाची आकडेवारी (मिमी) आणि विसर्ग (क्युसेक)
९४.५९ डिंभे, पाऊस : ७८५ विसर्ग : १५,०००
८२.२४ येडगाव, पाऊस : ४२१ विसर्ग : २,०३६
४४.८६ माणिकडोह, पाऊस : ४६७ विसर्ग : ००
५६.३७ वहज, पाऊस : ४४७ विसर्ग : २,०००
५३.७१ विसापूर, पाऊस : १४२ विसर्ग : ००
७९ चिल्हेवाडी, पाऊस : ४७१ विसर्ग : १,६९८

Web Title: Kukadi Project Water: 64.82 percent water storage in Kukadi Project due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.