कुरनूर धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी बुधवारी कुरनूर धरणातून यावर्षी दुसऱ्यांदा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून यातून प्रतिसेकंद २५० क्युसेक दराने पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली.
मागील हंगामात झालेल्या अत्यल्प पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात सध्या भर उन्हाळ्यात काही गावात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे अक्कलकोट तालुक्याच्या दक्षिण भागातील काही गावांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने तीन नगरपालिका आणि जवळपास २० ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मिटण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
दरम्यान, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात संबंधित प्रशासनाला निर्देश दिले होते.
८२२ दशलक्ष घनफूट क्षमता असलेले धरण◼️ अक्कलकोटच्या दक्षिण भागातील जनता आणि मुक्या प्राण्यांची हेळसांड होऊ नये, यासाठी ह निर्णय घेण्यात आला होता.◼️ कुरनूर धरणाखालील बोरी नदीत हे पाणी सोडण्यात आले असून नदीवरील किती बंधारे भरतील हे सांगता येणार नाही.◼️ ८२२ दशलक्ष घनफूट क्षमता पाणीसाठा असलेल्या कुरनूर धरणात २८ टक्के म्हणजेच जवळपास २२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.◼️ त्यातून ८ टक्के पाणी बोरी नदीत सोडण्यात आले असून जवळपास ८०-९० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे.
अधिक वाचा: Construct CCT : सलग समतल चर सीसीटी कसे खोदावेत; जाणून घ्या सविस्तर