Join us

Nashik Dam Storage : जून-जुलै संपला, तरीही नाशिक जिल्ह्यातील 'ही' धरणे तळाशीच, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 17:00 IST

Nashik Dam Storage : नाशिक जिल्हा प्रशासनाच्या पाणी अहवालानुसार आज जिल्ह्यातील धरणात 41.79 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 

Nashik Dam Storage : राज्यात सर्वदूर पाऊस (Rain) सुरु असून अनेक धरणे 100 टक्क्यांकडे वाटचाल करीत आहेत. अशातच उत्तर महाराष्ट्रात महत्वाचं असलेल्या नाशिक जिल्ह्यातील धरणात (Nashik Dam storage) चांगली आवक होत आहे. आजमितीस काही धरणातील धरणसाठा 50 टक्क्यांच्या वर गेला आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाच्या पाणी अहवालानुसार आज जिल्ह्यातील धरणात 41.79 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 

आज गंगापूर धरणात (Gangapur Dam) 65.63 टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी मात्र हे यादिवशी 80 टक्क्यांवर गेले होते. तर जिल्ह्याचा धरणसाठा आजमितीस 56.24 टक्के इतका होता. त्यामुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक धरणे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाचे दोन महीने संपले असून तिसऱ्या ऑगस्ट महिन्याला देखील सुरवात झाली आहे. जिल्ह्याच्या काही भागात पावसाची संततधार सुरुच असून मात्र देवळा, बागलाण या परिसरात अद्यापही मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. 

सध्याचा पाणीसाठा किती? 

आजच्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार कश्यपी 32.56 टक्के, गौतमी गोदावरी 63.65 टक्के, पालखेड 54.06 टक्के, पुणेगाव धरण 32.42 टक्के तर दारणा 85.51 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 78.02 टक्के, मुकणे 38.50 टक्के, कडवा 86.02 टक्के, करंजवण 22.83 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 100 टक्के, चणकापुर 45.53 टक्के, हरणबारी 70.41  टक्के, केळझर 61.71 टक्के, गिरणा 16.12 टक्के 0 टक्के अशी काही महत्त्वाची धरण मिळून 8.05 टक्के असा जलसाठा उपलब्ध आहे. तर पावसाच्या दोन महिन्यानंतरही ओझरखेड, तिसगाव, नागासाकया, माणिकपुंज धरणात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  

टॅग्स :गंगापूर धरणनाशिकधरणपाऊसहवामानशेती क्षेत्र