यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. धरणांत देखील पाणीसाठा कमी असल्याने यंदा ओढवणार असल्याची भीती आहे. नाशिक जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणांत 67.10 टक्के पाणी शिल्लक आहे. तर जिल्ह्याचा एकूण धरणसाठा पाहिला तर अवघा 55 टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 27 टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे.
यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने धरणांची स्थिती चिंताजनक आहे. अजून चार महिने पाणी पुरविणे सर्वांसमोर मोठे संकट आहे. नाशिक तालुके यापूर्वीच दुष्काळ सदृश्य म्हणून घोषित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची मिळून एकूण 24 धरणे असून या धरणांची पाणी साठवण क्षमता 65 हजार 664 दशलक्ष घनफूट इतकी आहे. गतवर्षी याच धरणांत जवळपास 82 टक्के म्हणजेच 53 हजार 843 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र केवळ 36 हजार 322 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे बहुतांश धरणामध्ये सरासरी पेक्षा कमी पाणी साठा आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक भागात पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे. आजच्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या धरणांमध्ये 55 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. यानुसार गंगापूर धरण 67 टक्के, पालखेड धरण 62 टक्के, दारणा धरण 52 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 94.55 टक्के, केळझर धरण 64.86 टक्के, माणिकपुंज धरण 27 टक्के अशी स्थिती आहे.
अशी आहे धरणांची स्थितीकश्यपी धरण 96.11 टक्के, गौतमी गोदावरी 79 टक्के, आळंदी 66 टक्के, ओझरखेड 47 टक्के, भावली 47 टक्के, वालदेवी 92 टक्के, हरणबारी 68 टक्के, गिरणा 42 टक्के अशी एकूण नाशिक जिल्ह्यातील धरणांची स्थिती आहे.