Join us

Gangapur Dam : गंगापूर धरणात 80 टक्के पाणीसाठा, यंदाच्या हंगामातील पहिला विसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 5:36 PM

Gangapur Dam : गंगापूर धरणातून यंदाच्या हंगामातील पहिला विसर्ग करण्यात येत आहे.

Gangapur Dam : गंगापूर धरणातून (Gangapur Dam) यंदाच्या हंगामातील पहिला विसर्ग करण्यात येत आहे. आजमितीस जवळपास 80.71 टक्के पाणीसाठा गंगापूर धरणात जमा झाला आहे. तर मागील वर्षी हाच साठा 83.16 टक्के इतका होता. सायंकाळी चार वाजेपासून गंगापूर धरणातून 04 हजार क्यूसेसने विसर्ग (Water Discharged) सुरू आहे. तर यात वाढ करून 6.00 वाजता एकूण विसर्ग 6000 क्यूसेस करण्यात येणार आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल पासून जोरदार पाऊस (Heavy Rain) असून, पावसाची संतत धार आजही कायम आहे. आज दिनांक 04/08/2024 रोजी दुपारी 12:00  वाजता गंगापूर धरणातून एकूण विसर्ग 500 क्यूसेस सोडण्यात आला. तर दुपारी 03:00 एकूण विसर्ग 1000 क्यूसेस करण्यात आला. त्यांनतर दुपारी 04:00  वाजता गंगापूर धरणातून एकूण विसर्ग 4000 क्यूसेस करण्यात आला होता. यात सद्यस्थितीत वाढ करून 6.00 वाजता एकूण विसर्ग 6000 क्यूसेस करण्यात येणार आहे. तसेच पावसचा जोर कायम असल्यास टप्या टप्याने एकूण विसर्ग वाढवण्यात येईल.

आज गंगापूर पाणलोट क्षेत्रात जवळपास 98 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 01 जून पासून आतापर्यंत जवळपास 892 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर मागील वर्षी याच दिवशी म्हणजे 04 ऑगस्ट रोजी 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत 651 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. दरम्यान दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने आज सकाळपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

गोदावरी नदीला पूर 

नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी शनिवार व रविवारी हवामान खात्याकडून 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. यानुसार शहरात मध्यम ते जोरदार पाऊस शुक्रवारी झाला; मात्र ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. आज सकाळपासून पाऊस सुरूच असल्याने गंगापूर धरणातून यंदाच्या हंगामातील पहिला विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली पहावयास मिळाली. गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होऊ लागल्याने पाणीपातळीत भर पडली. त्यामुळे गंगेला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला आहे. 

 

 

टॅग्स :गंगापूर धरणनाशिकपाऊसहवामानधरणमोसमी पाऊस