मुंबई : नाशिक, जळगाव (Nashik) जिल्ह्यांना सिंचनाचा मोठा फायदा करून देणाऱ्या नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता देण्याचा निर्णय रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पाची किंमत ७ हजार १५ कोटी २९ लाख एवढी आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून धरणांमधून ९.१९ टीएमसी पाणी उचलून १४.५६ कि.मी. बोगद्याद्वारे गिरणा नदी पात्रात चणकापूर धरणाच्या बाजूस सोडण्यात येईल. यामुळे ४९ हजार ७६१ क्षेत्र सिंचित होणार आहे. यामुळे रखडलेल्या योजनेला गती मिळणार आहे.
रविवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. नार-पार गिरणा नदीजोड (Nar Par Girana Project) ९ योजनेमुळे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील ४९ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. नार-पार या पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्र राज्यात उगम पावून पश्चिमेकडे वाहत अरबी समुद्राला मिळतात. हे अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अतितुटीच्या गिरणा उपखोऱ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे. १० ऑगस्ट रोजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली होती. आता तातडीने राज्य मंत्रिमंडळाने ७ हजार कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.
९ धरणांमधून ९.१९ टीएमसी पाणी उचलणार १४.५६ कि.मी. बोगद्याद्वारे चणकापूर धरणाच्या बाजूस पाणी सोडणार कळवण, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील २५,३१८ हेक्टर आणि जळगाव जिल्ह्यातील १७,०२४ हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ होणार शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी योजना प्रस्तावित
लाभक्षेत्रातील गावे भडगाव २३ गावे मालेगाव २२ गावे देवळा २१ गावे एरंडोल १२ गावे प्रस्तावित धरणे ०९ कळवण तालुका ८ गावे चाळीसगाव : २ गावे
लवकरच निविदा प्रक्रिया: देवेंद्र फडणवीस जळगाव : सिंचन क्षेत्र वाढवून येथील विकासाला गती देण्यासाठी नार-पार योजनेला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली असून लवकरच त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जळगावात झालेल्या लखपती दीदी संमेलनात केली. संमेलनाने आतापर्यंतचे उपस्थितीचे सर्व रेकॉर्ड मोडले असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.