Join us

Bhandardara Dam Discharged : भंडारदरा, निळवंडे धरणातून विसर्ग वाढविला, प्रवरा नदीला पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 6:01 PM

Bhandardara Dam Discharged : सद्यस्थितीत भंडारदरा धरण ९९.५३ टक्के भरले असल्याने ओसंडून वाहू लागले आहे.

Bhandardara Dam Discharged : राज्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचे जोरदार कमबॅक झाल्याने धरणांची पाणीपातळी पुन्हा वाढ झाली आहे. सद्यस्थितीत भंडारदरा धरण ९९.५३ टक्के भरले असल्याने ओसंडून वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर धरणातून २३  हजार ८०६ क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर निळवंडे धरणातून देखील विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा (Bhandardara Dam)  आणि निळवंडे धरण ही दोन्ही मुख्य धरणे आहेत. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली असून/होत असुन भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आवक सुरू आहे. धरण  पूर्ण साठा संचय पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून आज ३.३० वाजेपासून २३८०६ क्युसेक्स इतका पाणी विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे. 

तर हा पाणी विसर्ग थेट निळवंडे धरणामध्ये जमा होतो. त्यामुळे निळवंडे धरणातून देखील आता दुपारी ३.३० वाजेपासून २१७६५ क्युसेक्स इतका पाणी विसर्ग प्रवरा नदीत सोडण्यात आलेला आहे. प्रवरा नदीमध्ये अजूनही अधिक पाणी विसर्ग सोडला जाऊ शकतो. तरी कृपया प्रवरा नदीकाठच्या सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी असे विनंतीपूर्वक आवाहन करण्यात येत आहे. 

गंगापूर धरणातूनही विसर्ग 

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून जोरदार पाऊस सुरू असून पावसाची संततधार आजही कायम आहे. त्यामुळे आज सायंकाळी 06 वाजता गंगापूर धरणातून 7413 क्यूसेक ने विसर्ग सोडण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम असल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल अशी सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :अहमदनगरपाऊसधरणहवामानशेती क्षेत्र