Lokmat Agro >हवामान > महाराष्ट्रातील 'या' 22 जिल्ह्यात पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता! वाचा सविस्तर 

महाराष्ट्रातील 'या' 22 जिल्ह्यात पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता! वाचा सविस्तर 

Latest News Chance of heat wave for five days in 22 districts of Maharashtra Read in detail | महाराष्ट्रातील 'या' 22 जिल्ह्यात पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता! वाचा सविस्तर 

महाराष्ट्रातील 'या' 22 जिल्ह्यात पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता! वाचा सविस्तर 

त्यानुसार पुढील पाच दिवस राज्यातील 22 जिल्ह्यात उन्हाचा तडाखा बसणार आहे.

त्यानुसार पुढील पाच दिवस राज्यातील 22 जिल्ह्यात उन्हाचा तडाखा बसणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सद्यस्थितीत अवकाळी पावसाची शक्यता ओसरली असली तरीही उन्हाची दाहकता मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. ही उन्हाची दाहकता आगामी दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार राज्यातील 22 जिल्ह्यात उन्हाचा तडाखा बसणार आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे सर्वस्तरावरून करण्यात येत आहे.  

कोकणाबरोबर आता खान्देश व नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील ७ तालुके वगळता संपूर्ण पश्चिम-अर्ध महाराष्ट्रातील (मुंबईसह कोकण व नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच संपूर्ण मराठ वाडा) अशा २२ जिल्ह्यात आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार दि.४ एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवते. 
       
मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात मात्र उष्णतेच्या लाटेबरोबर घाम काढणाऱ्या दमट वातावरणाचा ही ह्या ५ दिवसात सामना करावा लागेल, असे वाटते. महाराष्ट्रातील लोकसभेच्या  तिसऱ्या टप्प्यातील मतदाना दरम्यान मात्र (६ व ७ एप्रिल ला) कदाचित कमाल व किमान अश्या दोन्हीही तापमानात काहीशी घट होवून सध्याच्या वातावरणापासून काहीसा दिलासाही मिळू शकतो, असे वाटते. 

लेखक : माणिकराव खुळे, जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ, आयएमडी पुणे 


 

Web Title: Latest News Chance of heat wave for five days in 22 districts of Maharashtra Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.