Join us

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात 'या' दिवशी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 7:34 PM

Nashik Rain : पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता दि. २९ जून ते ०३ जुलै २०२४ दरम्यान मध्यम पावसाची शक्यता आहे.

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) काही निवडक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र अद्यापही अनेक भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान कालपासून समाधानकारक पावसाला (rain) सुरवात झाली असून पुढील तीन दिवस माध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर 01 जुलै रोजी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. 

पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता दि. २९ जून ते ०३ जुलै २०२४ दरम्यान मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान दमट राहण्याची शक्यता राहील. आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहील. कमाल तापमान ३०-३२ डिग्री सें. व किमान तापमान २४-२५ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वा-याचा वेग १७-२८ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 

हवामान सतर्कता / इशारा : हवामानाचा अंदाज आणि चेतावणी लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोबत सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) वाहण्याची दाट शक्यता आहे. तसेच घाट क्षेत्रातील काही ठिकाणी दि. ०१ जुलै २०२४ रोजी जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबाबत मुंबई हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

हवामानावर आधारित कृषीसल्ला पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता भात रोपवाटिका, नवीन लावलेलि फळबाग व भाजीपाला पिकातून जास्तीचे पाणी काढून टाकावे.पडणा-या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी उपाय योजना करावी.पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता बाजरी, मका, भुईमुग, सोयाबीन, मुग, उडीद, तूर व इ. खरीप पिकांची पेरणी सुरु करावी.पेरणी करताना बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बियाणे पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.ज्या ठिकाणी लवकर पेरणी झाली असेल त्या ठिकाणी शेत तणमुक्त ठेवावे.पावसाचा अंदाजलक्ष्यात घेता वापश्यावर बीजप्रक्रिया करून मुग व उडीद पिकांची पेरणी सुरु ठेवावी. 

संकलन : विभागीय संशोधन केंद्र आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :पाऊसमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजनाशिकहवामान