नाशिक जिल्ह्यातील काही भागात 07 एप्रिल 2024 रोजी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व सोसाट्याचा वारा तसेच दि. 06 ते 09 एप्रिल दरम्यान हलका ते मध्यम पावसाचा अंदाज मुंबई आयएमडी विभागाने व्यक्त केला आहे.
पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता दि. 07 ते 10 एप्रिल 2024 दरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३८-४१ डिग्री से. व किमान तापमान २०-२१ डिग्री से. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग ९-१४ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, असा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे.
शेतकऱ्यांना काय सल्ला ?
हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत व मेघगर्जनेसह पाऊस किंवा गारपीठ साठी दामिनी मोबाईल अॅपचा उपयोग करावा. हवामानाचा अंदाज आणि इशारा लक्षात घेता व स्थानिक हवामानाची स्थिती ओळखून शेतकर्यांनी दि. ७ एप्रिल २०२४ आधीच रबी पिकांची कापणी/मळणी त्वरित पूर्ण करावी तसेच कापणी केलेल्या पिकांना सुरक्षित जागेवर किंवा प्लास्टिक / ताडपत्रीने झाकून ठेवावे. तसेच स्थानिक हवामानाची स्थिती ओळखून (खाली दिलेल्या सर्व पिकांच्या सल्ल्यातील) फवारणीच्या व इतर कामांची आखणी करावी. उन्हाळी पिकात सूक्ष्म सिंचनाचा (उदा. तुषार सिंचन) उपयोग करून पाण्याची बचत करावी. वाढते तापमान व पाण्याच्या अभावाखाली शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो कि फळ व भाजीपाला पिकांमध्ये मल्चिंगवा वापर करून बाष्पीभवनाच वेग कमी करावा.
काळजी घेण्याचे आवाहन
उन्हाळी वेलवर्गीय भाजीपाला पिकांस खुरपणी देऊन नत्र खताचा दुसरा हफ्ता द्यावा. नवीन लावलेल्या फळझाडांना गवताचे शेड करून तीव्र सुर्यकिरणांपासून त्यांचे संरक्षण करावे. तापमानाचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी पिकांना पाणी द्यावे. विजांच्या कडकडाटासह वादळ व हलका ते मध्यम पावसापासून फळ बाग, पशुधन, कुक्कुट पक्षी आणि स्वतःचे संरक्षण करा तसेच मेघदूत किंवा दामिनी मोबाईल अँप चा वापर करावा असे आवाहन मोसम कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांच्याकडून करण्यात आले आहे.
सौजन्य :
ग्रामीण कृषी मौसम विभाग वेधशाळा विभागीय कृषी संशोधन केंद्रा इगतपुरी जि. नाशिक