Lokmat Agro >हवामान > Weather Update : लोकसभा निवडणूक मतमोजणीला महाराष्ट्रात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

Weather Update : लोकसभा निवडणूक मतमोजणीला महाराष्ट्रात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

Latest News Chance of rain in Maharashtra during Lok Sabha election counting day see details | Weather Update : लोकसभा निवडणूक मतमोजणीला महाराष्ट्रात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

Weather Update : लोकसभा निवडणूक मतमोजणीला महाराष्ट्रात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

Loksabha Election Result : उद्या निकालाच्या दिवशी पावसाची शक्यता महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात वर्तविण्यात आली आहे.

Loksabha Election Result : उद्या निकालाच्या दिवशी पावसाची शक्यता महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात वर्तविण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Loksabha Election Result : सर्व देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल (Loksabha Election result 2024) उद्या लागणार आहे. एकीकडे निवडणुकांचे वातावरण तप्त असताना दुसरीकडे वातावरण मात्र पावसाचे असणार आहे. उद्या निकालाच्या दिवशी पावसाची शक्यता महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे ऐन मतमोजणीच्या (Loksabha Election Counting) तप्त वातावरणात पाऊस (Rain Alert) गारवा देऊन जाणार आहे. 

जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार (Weather Posdacast) उद्या मंगळवार दि. ४ जून दुपारनंतर महाराष्ट्रातील पुणे दक्षिण, नगर दक्षिण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड,  यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली अशा १२ जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात तुरळक ठिकाणी मान्सून पूर्व वळीव पावसाची दाट शक्यता जाणवते.         
             
बुधवार दि. ५ जून पासून मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यात भाग बदलत मान्सून पूर्व वळीव पावसाची शक्यता जाणवते. शुक्रवार दि.७ जून पासून मात्र मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र मान्सून आगमन पूर्व जोरदार वळीव पावसाची शक्यता अधिक जाणवते. मान्सून ने आज आगेकूच करत कर्नाटक,  आंध्र किनारपट्टी, तेलंगणा राज्यात प्रवेश केला आहे.

अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट 

राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागत असून आज राज्यात पुण्यासह १५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील दोन जिल्ह्यांमध्ये (Maharashtra weather update) उष्ण व दमट हवमान राहणार असल्याचे हवामान विभागाने नोंदवले. नैऋत्य मोसमी पावसाची अरबी समुद्राच्या मध्य भागात प्रगती होत असून पुढील आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. चक्राकार वाऱ्यांची बंगालच्या उपसागरात सक्रीय स्थिती असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

Web Title: Latest News Chance of rain in Maharashtra during Lok Sabha election counting day see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.