Lokmat Agro >हवामान > Nashik Weather : नाशिक जिल्ह्यात 25 आणि 26 एप्रिलला पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

Nashik Weather : नाशिक जिल्ह्यात 25 आणि 26 एप्रिलला पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

Latest News Chance of rain in Nashik district on April 25 and 26, read weather forecast | Nashik Weather : नाशिक जिल्ह्यात 25 आणि 26 एप्रिलला पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

Nashik Weather : नाशिक जिल्ह्यात 25 आणि 26 एप्रिलला पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

नाशिक जिल्ह्यात येत्या 25 व 26  एप्रिल रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे. 

नाशिक जिल्ह्यात येत्या 25 व 26  एप्रिल रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यभरात उष्णतेच्या लाटेने नागरिकांना हैराण केले आहे. दुसरीकडे मराठवाडा, विदर्भात मात्र सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात देखील वातावरण सातत्याने बदल असल्याचे जाणवते आहे. आता नाशिक जिल्ह्यात येत्या 25 व 26  एप्रिल रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता इगतपुरी येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने वर्तवली आहे. 

सध्याचे तापमान आणि अवकाळी पाऊस दोन्हीही चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत सातत्याने हवामानात बदल होत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत भरउन्हाळ्यात पाऊस बरसत आहे, तर काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी यांनी नाशिक जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता दि. २५ व २६ एप्रिल २०२४ रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच उर्वरित दिवस हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान ४०-४१ डिग्री सें. व किमान तापमान २३-२४ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग ८-१२ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 


शेतीपिकांसाठी काय सल्ला? 
विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसापासून मळणी केलेले पिके, पशुधन, कुक्कुट पक्षी आणि स्वतःचे संरक्षण करा. उन्हाळी हंगामात कृत्रिम किंवा जैविक आच्छादनांचा वापर करावा. शक्यतो जैविक आच्छादनांसाठी पालापाचोळा, गव्हाचा भुसा इ. चा वापर करावा. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सच्छिद्र प्लास्टिक जाळीचा वापर पिकांवर करावा. फुलोरा आणि फळ काढणीच्या काळात सकाळी, संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी एकसारख्या प्रमाणात करावा. भर उन्हात पाणी देणे कटाक्षाने टाळावे. झाडावरील जुनी, रोगटपाने, रोगग्रस्त फळे आणि फांद्या काढून शेताच्या बाहेर टाकाव्यात. फुल अथवा फळगळ कमी करण्यासाठी १० ते २० पीपीएम तीव्रतेचे एन. ए. ए. या संजीवकाची १ ते २ वेळा फवारणी करावी. 


पशुधनासाठी काय सल्ला? 

जनावरांना गोठयामध्ये थंड जागी किंवा झाडाखाली बांधावे. गोठयाच्या छपरावर गवत, पाला पाचोळा टाकून पाणी शिंपडावे त्यामुळे गोठा थंड राहातो. दुपारच्या प्रहरी हिरवी मका, चवळी, कडवळ, लसूण घास यासारखी पोषक वैरण दयावी. त्यामुळे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहते व प्रजनन क्षमताही सुधारते. प्राण्यांना सावलीत ठेवा आणि पिण्यास भरपूर स्वच्छ आणि थंड पाणी द्या.त्यांच्या कडून सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० दरम्यान काम करून घेऊ नये. पेंढाच्या (गवत) मदतीने शेडचे छप्पर  झाकून ठेवावे, तापमान कमी करण्यासाठी त्यास पांढरा रंग द्यावा किंवा शेण- चिखलसह थर द्यावा. जनावरांना चा-यांची कमतरता असल्यास गव्हाच्या काडावर तज्ञांच्या सल्ल्यानुसार युरीयाची प्रक्रिया करुन जनावरांना खाऊ घालावे. शेळ्यांना बुळकांडी रोगप्रतिबंधक लस या महिन्यात (एप्रिलमध्ये) टोचुन घ्यावी. त्यांना हिरवे गवत, प्रथिनेयुक्त पर्यायी स्निग्ध पूरक खाद्य, खनिज मिश्रण आणि मीठयुक्त द्रावण.

Web Title: Latest News Chance of rain in Nashik district on April 25 and 26, read weather forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.