Join us

Weather Update : अहिल्यानगर, जळगांव, नाशिक जिल्ह्यात एकाकी थंडाव्यात वाढ, वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:11 IST

Weather Update : महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात बुधवार दि. ५ मार्च पासून पहाटे ५ च्या किमान तापमानात एकाकी घसरण झाली आहे.

Weather Update : संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश व नाशिक (Nashik Cold Weather) जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात बुधवार दि. ५ मार्च पासून पहाटे ५ च्या किमान तापमानात एकाकी घसरण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये काल सर्वात नीचांकी तापमान म्हणजेच ४.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर आज देखील ८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. 

महाराष्ट्रातील काही ठिकाणी म्हणजे अहिल्यानगर, जळगांव, नाशिक या शहर व जिल्हा परिसरात थंडीची (Cold Weather) लाट व थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती जाणवू लागली आहे. सदर परिस्थिती बुधवार दि. ५ ते शनिवार दि. ८ मार्च असे चार दिवस राहण्याची शक्यता जाणवते.          कशामुळे ही परिस्थिती निर्माण झाली?           काल बुधवार दि.५ मार्चपासून उत्तर भारतातून उत्तर दिशेने महाराष्ट्राकडे थंडी घेऊन येणारे वारे महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश व नाशिक जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात धडकू लागल्यामुळे एकाकी ही थंडीत वाढ होतांना दिसत आहे. 

गेल्या दिड महिन्यापासून म्हणजे २५ जानेवारीपासून ते काल बुधवारपर्यंत बंगालच्या उपसागरातून  पूर्वीय दिशेचे दमट व आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या एकसूरी वहनातून उत्तर दिशेने महाराष्ट्रात थंडी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना अटकाव होत होता. तो अटकाव वारा वहन प्रणालीतून बदलातून जाणवत आहे. 

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd)IMD Pune.

टॅग्स :हवामान अंदाजशेती क्षेत्रशेतीकृषी योजना