Join us

Nashik : नाशिक जिल्ह्यात अवकाळीने पिकांची दाणादाण, तब्बल 32 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

By गोकुळ पवार | Published: November 27, 2023 9:48 PM

Nashik : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळ32 हजार 832 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालं आहे. 

Nashik : नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं कृषी विभागाकडून या संदर्भातला प्राथमिक अहवाल आला असून सर्वाधिक नुकसान निफाड तालुक्यात झाले आहे. त्या खालोखाल चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतीपिकांचे झाल आहे. जिल्ह्यात जवळपास 32 हजार 832 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालं आहे. 

नाशिक जिल्ह्यात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तास दोन तास झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठं प्रचंड नुकसान झालं आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 32 हजार हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तर 67 हजार 866 शेतकरी बाधित झाले आहेत. 890 गावांना अवकाळीचा फटका बसला असल्याचं देखील समोर आल आहे. 

प्राथमिक अहवालानुसार निफाड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आला आहे तालुक्यातील 13832 शेतकरी बाधित झाले असून 102 गावांना अवकळीचा फटका बसला आहे तर जवळपास 9294 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं आहे. यात कांदा 1073 हेक्टर, गहू 578 हेक्टर, ऊस 221 हेक्टर, भाजीपाला व इतर पिके 411 हेक्टर, तर सर्वाधिक 6870 हेक्टरवरील द्राक्षांचा निफाड तालुक्यात नुकसान झाला आहे. तर चांदवड तालुक्यात देखील 7 हजार 577 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं आहे. तसेच जिल्ह्यातील मालेगाव आणि देवळा तालुका सोडला तर सर्वच तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

कोणत्या तालुक्यात किती नुकसान 

या सटाणा तालुक्यात 570 हेक्टर, नांदगाव तालुक्यात 3253 हेक्टर, कळवण तालुक्यात 773 हेक्टर, दिंडोरी तालुक्यात 2964 हेक्टर, सुरगाणा तालुक्यात 225 हेक्टर, नाशिक तालुक्यात 868 हेक्टर, त्र्यंबकेश्वर तालुक्यात 228 हेक्टर, पेठ तालुक्यात 556 हेक्टर, इगतपुरी तालुक्यात 5920 हेक्टर, सिन्नर तालुक्यात 37 हेक्टर, येवला तालुक्यात 565 हेक्टर असे नुकसान झाले आहे.

कोणत्या पिकांचे किती नुकसान?

दरम्यान या अहवालानुसार सर्वाधिक नुकसान हे द्राक्ष पिकाचे झाला असून तब्बल 11 हजार 597 हेक्टरवरील द्राक्ष पिकाचे नुकसान झालं आहे. त्या खालोखाल 10 हजार 408 हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यानंतर भात पिकाचे देखील 6729 हेक्टरवरील शेतीचा नुकसान झाला आहे. मका 169 हेक्टर सोयाबीन 18 हेक्टर भाजीपाला व इतर 488 हेक्टर, टोमॅटो 310 हेक्टर, ऊस 221 हेक्टर, डाळिंब 34 हेक्टर यानुसार पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :द्राक्षेनाशिकपीकपाऊस