Lokmat Agro >हवामान > Rain In North Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात डांगी पावसाचा जोर वाढणार, कुठे-कुठे पडणार पाऊस? 

Rain In North Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात डांगी पावसाचा जोर वाढणार, कुठे-कुठे पडणार पाऊस? 

Latest News Dangi rain will increase in North Maharashtra, see monsoon update | Rain In North Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात डांगी पावसाचा जोर वाढणार, कुठे-कुठे पडणार पाऊस? 

Rain In North Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात डांगी पावसाचा जोर वाढणार, कुठे-कुठे पडणार पाऊस? 

Weather Update : मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात रविवार दि.३० जूनपर्यंत वर्तवलेली मध्यम पावसाची शक्यता कायम आहे.

Weather Update : मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात रविवार दि.३० जूनपर्यंत वर्तवलेली मध्यम पावसाची शक्यता कायम आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Weather Update : मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) १० जिल्ह्यात रविवार दि.३० जूनपर्यंत वर्तवलेली मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. तरी आता खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगांव (Jalgaon) अशा तीन जिल्ह्यात तसेच उत्तर नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यात मात्र आजपासुन आठवडाभर म्हणजे गुरुवार दि. ४ जुलैपर्यंत, गुजरात राज्याच्या पश्चिमेंकडून येणारा अरबी समुद्र शाखीय म्हणजे डांग जिल्ह्याच्या घळीतून येणाऱ्या डांगी पावसाची जोरदार (Rain Update) शक्यता मात्र वाढली असल्याची माहिती जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. 
                
तसेच खुळे यांच्या अंदाजानुसार नाशिक (Nashik Rain) जिल्ह्याच्या उर्वरित नाशिक, सिन्नर, नांदगाव, निफाड येवला या ५ तालुक्यात तसेच नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ६ जिल्ह्यात रविवार दि. ३० जूनपर्यंत मात्र वर्तवलेली मध्यम पावसाचीच शक्यता ही तशीच आहे. मुंबईसह कोकण व विदर्भात रविवार दि. ३० जूनपर्यंत वर्तवलेली जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. फक्त दरम्यानच्या पाच दिवसात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यापैकी काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता ही तशीच आहे. 

महाराष्ट्रात कसा असेल पाऊस
आज दिनांक २६ जून पासून पुढील तीन दिवस म्हणजेच २६, २७ आणि २८ जूनपर्यंत महाराष्ट्रात भारतीय हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे. दिनांक २६ जून रोजी कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. दररम्यान निवृत्त हवामान शास्त्रज्ञ के. एस होसाळीकर यांनी एक्सवर वर्तविलेल्या अंदाजानुसार आज कोकण किनारपट्टी भागात निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.

Web Title: Latest News Dangi rain will increase in North Maharashtra, see monsoon update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.