Join us

Maharashtra Earthquake : हिंगोली जिल्ह्यासह नांदेडमध्ये भूकंपांचे धक्के, मराठवाड्याला भूकंपाचा धोका कशामुळे? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 3:36 PM

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यासह परभणी, वाशिम, नांदेडमध्ये भूकंपांचे धक्के बसले आहेत.

मुंबई : मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यासह परभणी, वाशिम, नांदेडमध्येभूकंपांचे धक्के (Earthquake) बसले आहेत. सकाळी सातच्या सुमारास हा भुकंप झाला असून . ४.५ रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात हे भूकंपांचे केंद्र असल्याचे समजते. भूगर्भातील टॅक्टॉनिक प्लेटसच्या हालचालीमुळे हा भूकंप झाल्याचे भुकंप अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. शिवाय येत्या काळात मराठवाड्यासह (Marathwada Earthquake) महाराष्ट्राला मोठ्या भुकंपाचा धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

आज सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली (Hingoli) जिल्हा हादरला. जवळपास 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यात हिंगोली जिल्ह्यासह परभणी, वाशिम, नांदेडमध्ये (Nanded Earthquake) भूकंपांचे धक्के बसले आहेत. नांदेड आणि हिंगोली यांच्यामध्ये केंद्रबिंदू असलेला ४.५ रिश्टरचा भुकंप आतापर्यंत सर्वात मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे. कमी भुकंप तीव्रता असलेल्या भुकंप सुरक्षित मराठवाड्याच्या या भागात याआधी कधीही एवढा मोठा भुकंप झाला नव्हता. टॅक्टॉनिक प्लेटसवरील प्रेशन वाढले आहे आणि अद्यापही ते पुर्णपणे मोकळे झालेले नाही. भुगर्भातील हालचालींमुळे येत असलेले आवाज आणि भुजल पातळी खाली जात कोरड्या पडत असलेल्या कुपनलिकांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे जोहरे यांनी स्पष्ट केले. 

याशिवाय कोयना धरण परीसर, कोंकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र व गुजरातचा सीमाभाग व हिमालयाच्या पायथ्याची राज्ये आदी ठिकाणी भुकंपाचा धोका कायम आहे. नागरीकांनी घाबरून न जाता धैर्याने आपत्कालिन परीस्थितीसाठी तयार राहणे आवश्यक आहे. गॅसचे क्नॉब व गॅस पाईपलाईन वापरानंतर बंद करणे, विद्युत प्रवाह खंडीत होत असल्याने रात्रीच्या वेळी चार्जेबल बल्ब वापरणे, मोबाईल व इन्वर्टर चार्ज करून ठेवणे, लहानमुले-वृद्ध-गरोदर स्त्रीया यांची विशेष काळजी घेत त्यांना अग्रक्रमाने आधार देणे, हॉस्पीटल्समध्ये पुरेसे ऑक्सिजन सिलेंडर व विद्युत पुरवठा सुरळीत होणारी व्यवस्था कार्यान्वित करणे, लिफ्टचा वापर भुकंप होत असतांना टाळणे आदी काळजी घेणे आवश्यक आहे अशी शास्त्रीय माहिती देत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन भुकंप अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले आहे.

नेमकं कशामुळे? 

फेब्रुवारी मार्चमध्ये देखील या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर जवळपास तीन महिन्यानंतर हा 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. याचे कारण म्हणजे या भागातील टॅक्टॉनिक प्लेटस हालचाली वाढल्या असून जमिनीतील दाब वाढल्यामुळे यावेळी भूकंपाची तीव्रता देखील वाढली आहे. आगामी काळात मराठवाडा, महाराष्ट्र, उत्तर भारतात, हिमालय रंगाच्या पायथ्याशी भूकंपाची शक्यता नाकारता येत नाही, असे सूतोवाच प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले आहेत. 

टॅग्स :भूकंपमराठवाडाहिंगोलीनांदेडहवामान