Lightning Strike : दरवर्षीं पावसाळ्यात वीज अंगावर (lightning strikes) पडून अनेकांचा मृत्यू होतो. तसेच जनावरे दगावल्याच्या अनेक घटना देखील समोर येतात. यातील बहुतांश घटना या ग्रामीण भागात घडत असतात, शिवाय शेतकरी, त्यांची जनावरे याला बळी पडत असतात. म्हणूनच पावसाळ्यात (rainy) शेतकऱ्यांसह नागरिकांच्या मनात धाकधूक वाढलेली असते. यापासून वाचण्यासाठी काय करायल हवं, यासाठी हि बातमी नक्की वाचा!
जर शेतकरी (farmer) शेतात असतील आणि त्यांना कोणताही निवारा मिळाला नसेल तर त्या परीसरातील सर्वात उंच वस्तू टाळा. जर फक्त तुरळक झाडे जवळपास असतील तर सर्वात चांगले संरक्षण म्हणजे उघड्यावर दबा धरून बसावे. आपले पाय पोटाशी व हात कानावर आणि डोळे झाकावे म्हणजे शरीराचा आकार कमी करणे. विद्युत उपकरणे किंवा वायर/केबल चा संपर्क टाळा. कोणत्याही धातू-ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे आणि दुचाकींचा संपर्क दूर ठेवा. जे धातू किंवा इतर पृष्ठभाग विद्युत वाहक आहेत, अशा गोष्टीपासून दूर राहा.
जनावरांची काळजी घ्या...
तसेच प्राण्यांना ट्रॅक्टर आणि इतर धातूंच्या शेतीच्या उपकरणांपासून दूर ठेवा. आपल्या प्राण्यांना झाडाखाली जमू देऊ नका. प्राण्यांकडे लक्ष्य ठेवा आणि त्यांना आपल्या थेट नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करा. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटसह गारपीट किंवा हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज लक्ष्यात घेता दुभत्या जनावरांना गोठ्यात ठेवा. गुरे व शेळ्यांना शेडमध्ये ठेवा आणि त्यांना गारपीट पासून वाचवण्यासाठी प्राण्यांना खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवा. मेघगर्जनेसह वादळ व पावसापासून पशुधन व कुक्कुट पक्ष्यांचे साठवलेले पशुखाद्य, चारा व कडबा याचे प्लास्टिक/ ताडपत्रीने झाकून संरक्षण करावे.
दामिनी मोबाईल अँपचा उपयोग करा
हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत व मेघगर्जनेसह पाऊस साठी दामिनी मोबाईल अॅपचा उपयोग करावा. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता मळणी केलेले पिके, फळे व भाजीपाला, पशुधन, कुक्कुट पक्षी आणि स्वतःचे संरक्षण करा. पडणाऱ्या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी उपाय योजना करावी जसे की कमी पाऊसमान असणाऱ्या क्षेत्रात मुलस्थानी जलसंधारण करणे करिता ३० सें.मी. अंतरावर पाभरीच्या सहाय्याने सरी पाडून ठेवाव्यात, असे सूचनावजा आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषि हवामान प्रक्षेत्र विभागमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी ता. इगतपुरी, जि. नाशिक