Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यात (Nashik District) २४ तासांत सरासरी १९ मिमी पाऊस झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नांदूरमधमेश्वर येथून रात्री ३० हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. गंगापूर धरणाची पाणीपातळी ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून शनिवारी रात्री ८ वाजता जलसाठा ५,६०३ दलघमी फूटापर्यंत पोहोचला होता.
नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरासह ग्रामीण भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत रेड अलर्ट' जारी करण्यात आला होता. या दरम्यान ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाल्याने सायंकाळी ७ वाजता गंगापूर धरणातून ८४२८ क्युसेक इतका विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला. तर गौतमी धरणसुद्धा ९६ टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. यामुळे शनिवारी सायंकाळी गौतमी-मधून १,५३६ क्युसेकचा विसर्ग गंगापूर धरणात सोडण्यात आला. यामुळे ४ हजार क्युसेकने गंगापूर- मधून गोदावरीत विसर्ग वाढवून तो ८,४२८ क्युसेक इतका करण्यात आला होता.
आजमितीस धरणाचा पाणीसाठा
गंगापुर ९१.५८ टक्के, दारणा ९६.६८ टक्के, कडवा ८६.०२ टक्के, पालखेड(ऊ) ८९.७४ टक्के, मुकणे (ऊ) ७०.०९ टक्के, करंजवण (ऊ) ७६.०९ टक्के, गिरणा TMC/५०.६६ टक्के, हतनुर (ऊ) TMC/३१.४५ टक्के, वाघुर (ऊ) TMC/७७.६५ टक्के, मन्याड (ऊ) TMC/०.०० टक्के, गुळ (ऊ) TMC/५९.६१ टक्के, अनेर (ऊ) TMC/५२.२६ टक्के.
काही धरणाचा विसर्ग
गंगापूर धरणातून ८,४२८ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच नांदूर मधमेश्वर धरणातून रात्री ९ नंतर ३० हजार १६९ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. पालखेड धरणातून कादवात ८३० क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दारणा धरणातूनही १४,८१२ क्यूसेक, भावली धरणातून ७०१, भाम धरणातून २१७०, वालदेवीतून १०७, कडवातून ५६२६, आळंदीतून ८०, भोजापूरमधून १५२४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता.