जळगाव : गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) जलसाठा समाधानकारक आहे. मात्र, मार्चच्या मध्यान्हातच गिरणा धरण ४४ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे पुढच्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत गिरणा धरणातील (Girana Dam) जलसाठा जपूनच वापरावा लागणार आहे.
गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे सर्वच प्रकल्पांत समाधानकारक (Water Storage) जलसाठा आहे. २०२३ मध्ये जेमतेम पाऊस झाल्याने २०२४ च्या मार्च महिन्यात जिल्ह्यात केवळ ४७.३१ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र हा साठा ५५.१३ टक्के इतका आहे. हतनूर आणि वाघूरमध्ये जलसाठा मोठ्या प्रमाणात आहे. २०२४ मध्ये मन्याड आणि शेळगाव बॅरेजमध्ये ५० टक्क्यांवर जलसाठा आहे.
शेळगावमधून आवर्तन
दरम्यान, शेळगाव प्रकल्प नव्याने उभारण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पात २३१६ द.ल.घ.फू. जलसाठा आहे. प्रकल्पाची स्थिती पडताळण्यासाठी आणि सिंचनसाठ्याच्या तपासणीसाठी या प्रकल्पातून निम्म्यावर पाणी आवर्तनाद्वारे सोडले जात आहे. त्यातून जळगाव, धरणगाव व चोपडा तालुक्यातील काही गावांना फायदा होणार आहे.
यावर्षीचा जलसाठा
मागील वर्षी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मार्चमध्ये ४७ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र ५५ टक्के जलसाठा आहे. तर जिल्ह्यातील इतर धरणातील जलसाठा पाहिला असता हतनुर धरणात ६८.०४ टक्के, गिरणा ४४.५८ टक्के, वाघुर ८४. ८१ टक्के, मन्याड ५४.३८ टक्के, शेळगाव बॅरेज ५९.४४ टक्के, हिवरा ४२.६५ टक्के असा प्रमुख धरणातील जलसाठा आहे.