नाशिक : एकीकडे उष्णतेने कहर केला असून राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस देखील बरसत आहे. नाशिक जिल्ह्यातही वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. नुकत्याच मुंबई हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेसह हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
मुंबई हवामान विभागाच्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी आगामी दि.१७ व १८ एप्रिल २०२४ रोजी उष्णतेची लाट येण्याची अधिक शक्यता आहे. तसेच दि. १९ एप्रिल २०२४ रोजी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट सोबत सोसाट्याचा वारा ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाहण्याची अधिक शक्यता आहे. दि. २१ एप्रिल २०२४ रोजी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांसाठी काय सूचना
उभ्या पिकांना हलके व वारंवार सिंचन द्या. पीक जस-जसे मोठी/ वाढतात त्याप्रमाणे पाण्याची आवश्यकता असते ते पूर्ण करण्या करिता सिंचनाची वारंवारता वाढवा. मातीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकाचे अवशेष, पेंढा/ पॉलिथिन/ गवतांचा आच्छादन म्हणून वापर करावा. फक्त संध्याकाळी किंवा अगदी सकाळच्या वेळी (उन कडक होण्यापूर्वी) पाणी द्यावे. आपला विभाग उष्ण लहर प्रवन चे क्षेत्र असेल तर तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा आणि वारा/ निवारा चे ब्रेक उपयोगात आणायचे. पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी मळणी केलेल्या रबी पिकांना सुरक्षित जागेवर किंवा प्लास्टिक/ ताडपत्रीने झाकून ठेवावे.
पशुपालकांसाठी महत्वाचे आवाहन
प्राण्यांना खुले पाणी, तलाव किंवानदीपासून दूर ठेवा. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. प्राण्यांना सावलीत ठेवा आणि पिण्यास भरपूर स्वच्छ आणि थंड पाणी द्या.त्यांच्या कडून सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० दरम्यान काम करून घेऊ नये. पेंढाच्या (गवत) मदतीने शेडचे छप्पर झाकून ठेवावे, तापमान कमी करण्यासाठी त्यास पांढरा रंग द्यावा किंवा शेण- चिखलसह थर द्यावा. शेडमध्ये पंखे, वाटरस्प्रे आणिफॉगर्स वापरावे. तीव्र उष्णते दरम्यान, पाणी फवारणी करावी आणि गोठ्याजवळच थंड पाण्यासाठी सोय करावी. त्यांना हिरवे गवत, प्रथिनेयुक्त पर्यायी स्निग्ध पूरक खाद्य, खनिज मिश्रण आणि मीठयुक्त द्रावण सेवन करण्यास द्यावे.
सौजन्य
ग्रामीण कृषी मौसम सेवा
कृषि हवामान प्रक्षेत्र विभाग
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी