Maharashtra Dam Storage : राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. मात्र अधून मधून जोरदार पावसाचे आगमन होत आहे. परिणामी धरणे ओसंडून वाहत आहेत. आजमितीस भंडारदरा, निळवंडे धरण १०० टक्के भरले असून जायकवाडी धरण देखील ९८.९४ टक्के भरले आहे. तर विसर्ग देखील सुरु आहे. आजच्या घडीला काही निवडक धरणांत किती पाणी आहे, हे पाहुयात...
राज्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा : दि. ११ सप्टेंबर सकाळी ६.०० वा.
======================
भंडारदरा (एकुण)::११०३९ दलघफुट (१००.००%)
निळवंडे (एकुण)::८३२० दलघफुट (१००.००%).
मुळा (एकुण):::::२५०१३ दलघफुट (९६.२०%)
गंगापूर (उपयुक्त)::::५४१९ दलघफुट (९६.२५%).
दारणा (उपयुक्त):::७०३१ दलघफुट (९८.३५%).
जायकवाडी धरण (एकुण)::१०१.६४ टीएमसी/ (९८.९४%).
उपयुक्त : ७५.५७ टीएमसी/ (९८.५७%).
आजची आवक व एकूण आवक : १.०१४१/७७.२०९१ टी.एम.सी.
आजची जावक व एकूण जावक : ००.७५०/१.०२७२ टी.एम.सी.
======================
जायकवाडीत अ. नगर व नाशिक जिल्ह्यांतील प्रमुख धरणांमधून सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स)
भंडारदरा : ८३०
निळवंडे : ०००.
आढळा : ७०
भोजापूर : ०००
ओझर : ६२०
कोतुळ : ८८६
मुळा धरण : २०००
नांदूर मधमेश्वर (गोदावरी) : ३१५५
जायकवाडी धरण : ८६७६.