Lokmat Agro >हवामान > Water Storage : कोणत्या जिल्ह्यात किती पाणी शिल्लक? किती पाण्याचा उपसा? वाचा सविस्तर 

Water Storage : कोणत्या जिल्ह्यात किती पाणी शिल्लक? किती पाण्याचा उपसा? वाचा सविस्तर 

Latest News How much water is left in the district of Maharashtra? see details | Water Storage : कोणत्या जिल्ह्यात किती पाणी शिल्लक? किती पाण्याचा उपसा? वाचा सविस्तर 

Water Storage : कोणत्या जिल्ह्यात किती पाणी शिल्लक? किती पाण्याचा उपसा? वाचा सविस्तर 

राज्याच्या भूगर्भात अजूनही १४ अब्ज क्युबिक मीटर जलसाठा उपलब्ध असल्याचा अहवाल केंद्रीय भूजल मंडळाने दिला आहे.

राज्याच्या भूगर्भात अजूनही १४ अब्ज क्युबिक मीटर जलसाठा उपलब्ध असल्याचा अहवाल केंद्रीय भूजल मंडळाने दिला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असतानाच राज्याच्या भूगर्भात अजूनही १४ अब्ज क्युबिक मीटर जलसाठा उपलब्ध असल्याचा अहवाल केंद्रीय भूजल मंडळाने दिला आहे. मात्र, गेल्या वर्षी ज्यांनी पाऊस साठविला, त्याच प्रदेशांना या पाण्याचा लाभ होऊ शकणार आहे. इतरांची टँकरवारी यंदाही कायम राहणार आहे.

केंद्रीय भूजल मंडळाने महाराष्ट्रातील भूजलसाठ्याची आकडेवारी वार्षिक अहवालात जाहीर केली आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्रात पडलेला पाऊस, त्यातून जमिनीत जिरलेला पाऊस, त्यातून वर्षभरात झालेला पाण्याचा उपसा आणि आता भविष्यकाळासाठी वापरण्यायोग्य उरलेला जलसाठा अहवालात नमूद केला आहे.

या जिल्ह्यांना भासणार टँकरची गरज

७० टक्क्यांपेक्षा अधिक भूजलाचा उपसा करणाऱ्या जिल्ह्यांना केंद्रीय भूजल मंडळाने 'ओव्हर एक्स्प्लॉइटेड'च्या वर्गवारीत नमूद केले आहे. येथे अत्यल्प भूजल शिल्लक असल्याने या जिल्ह्यांना उन्हाळ्यात टँकरद्वारेच नागरिकांची तहान भागवावी लागणार आहे. यात अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे.


गेल्या वर्षीचा पाऊस अन् भूजल साठ्याची सद्यस्थिती
 
32 अब्ज क्यूबिक मीटर जल पुनर्भरण झाले, तर 16 अब्ज क्यूबिक मीटर पाण्याचा उपसा झाला. सद्यस्थितीत 14 अब्ज क्यूबिक मीटर पाणी जमिनीत शिल्लक आहे. तर 2 अब्ज क्यूबिक मीटर पाण्याची वाफ झाल्याचे अहवालातून दिसून आले.


कोणत्या जिल्ह्यात किती टक्के साठा?

अमरावती जिल्हा ९१.८३ उपसा, तर ८.१७ शिल्लक साठा, अहमदनगर जिल्हा ७९.२० उपसा, २०.८० शिल्लक साठा, जळगाव जिल्हा ७८.७६ उपसा, २१.२४ शिल्लक साठा, सोलापूर जिल्हा ७७.५४ उपसा, २२.४६ शिल्लक साठा, बुलढाणा जिल्हा ७६.९५ उपसा, २३.०५ शिल्लक साठा, छ. संभाजीनगर जिल्हा ७१.६४ उपसा, २८.३६ शिल्लक साठा, पुणे जिल्हा ६९.६५ उपसा, ३०.३५ साठा, अकोला जिल्हा ६५.५९ उपसा, ३४.४१ शिल्लक साठा, सातारा जिल्हा ३७.८९ उपसा,६२.११ साठा, धाराशिव जिल्हा ६२.०१ उपसा, ३७.९९ शिल्लक साठा, वाशिम जिल्हा उपसा ६०.२०, शिल्लक साठा ३९.८० टक्के, बिड जिल्हा ५९.२२ उपसा, शिल्लक साठा ४०.७८ टक्के, नाशिक जिल्हा उपसा ५८.४१ तर शिल्लक साठा ४१.५९ टक्के, लातूर जिल्हा ५४.८८ उपसा तर शिल्लक साठा ४५.१२ टक्के, जालना जिल्हा ५४.८५ टक्के उपसा तर शिल्लक साठा ४५.१५ टक्के, सांगली जिल्हा ५४.१९ टक्के उपसा तर शिल्लक साठा ४५.८१ टक्के, वर्धा जिल्हा ५३.५५ उपसा तर शिल्लक साठा ४६.४५ टक्के, धुळे जिल्हा ५१.७७ उपसा तर शिल्लक साठा ४८.२३ टक्के, 

नागपूर जिल्हा ४८.९४ उपसा, तर शिल्लक साठा ५१.०६ टक्के, परभणी जिल्हा  उपसा ४६.५० टक्के तर शिल्लक साठा ५३.५० टक्के, सिंधुदुर्ग जिल्हा उपसा ४३.३३ टक्के,  शिल्लक साठा ५६.६७ टक्के, कोल्हापूर जिल्हा ४२.४५ उपसा तर शिल्लक साठा ५७.५५, नंदुरबार जिल्हा ३८.०८ उपसा तर शिल्लक साठा ६१.९२ टक्के, हिंगोली जिल्हा ३६.४१ उपसा तर शिल्लक साठा ६३.५९ टक्के, यवतमाळ जिल्हा ३३.७५ उपसा तर शिल्लक साठा ६६.२५ टक्के, नांदेड जिल्हा ३२.३७ उपसा तर शिल्लक साठा ६७.६३ टक्के, भंडारा जिल्हा ३०.२२ उपसा, तर शिल्लक साठा ६९.७८ टक्के , चंद्रपूर जिल्हा २९.३२ उपसा, शिल्लक साठा ७०.६८ टक्के, गोंदिया जिल्हा २६.३१ उपसा, तर शिल्लक साठा ७३.६९ टक्के, गडचिरोली जिल्हा २४.३७ उपसा तर शिल्लक साठा ७५.६३ टक्के, पालघर जिल्हा २३.८५ उपसा तर शिल्लक साठा ७६.१५ टक्के, ठाणे जिल्हा १९.०७ उपसा तर शिल्लक साठा ८०.९३ टक्के, रायगड जिल्हा  १७.९४ उपसा तर शिल्लक साठा ८२.०६ टक्के, रत्नागिरी जिल्हा १७.३० उपसा तर शिल्लक साठा ८२.७० टक्के असा एकूण ५३.८३ टक्के उपसा झाला असून ४६.१७ टक्के शिल्लक साठा आहे.

Web Title: Latest News How much water is left in the district of Maharashtra? see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.