Gangapur Dam : राज्यातील काही भागात मान्सूनचे (Monsson Update) आगमन झाले असले तरीही अदयाप अनेक भागामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक भागात पाऊस झाला आहे, मात्र सध्याच्या पावसाने धरणामध्ये (dam storage) फारसा साठा जमू शकलेला नाही. त्यामुळेच अद्यापही बहुतांश धरणे तळाशीच असून नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण (Gangapur dam) 18.58 टक्क्यांवर आहे.
आजमितीस नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) धरणात केवळ 8.5 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नाशिकसह सर्वच जिल्ह्ये पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नाशिक जिल्ह्याचा विचार करता आज आठ धरणे कोरडीठाक असून सात धरणे 5 टक्क्यांच्या आत आहेत. त्यामुळे गावामध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक गावामध्ये आजही टँकर सुरु आहेत. जून महिन्याचे १५ दिवस उलटूनही दुष्काळाची दाहकता जाणवत आहे.
सध्याचा पाणीसाठा किती?
आजच्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार कश्यपी 23.27 टक्के, गौतमी गोदावरी 10.44 टक्के, पालखेड 20.52 टक्के, तर मागील आठवडाभरापासून ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव धरणात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दारणा 3.66 टक्के, भावली 0 टक्के, वालदेवी 0 टक्के, मुकणे 3.8 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 94.55 टक्के, चणकापुर 4.57 टक्के, हरणबारी 7.80 टक्के, केळझर 0.52 टक्के, गिरणा 12.18 टक्के तर माणिकपुंज 0 टक्के अशी काही महत्त्वाची धरण मिळून 8.05 टक्के असा जलसाठा उपलब्ध आहे.