Join us

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात जुलै महिन्यातील पावसाची स्थिती कशी असेल? वाचा हवामान अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 4:28 PM

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची (Rain Update) शक्यता नाही.

Weather Update : संपूर्ण देशामध्ये लेह लडाख व पूर्व तामिळनाडू व पूर्वोत्तर ७ राज्ये वगळता जुलै महिन्यात  जेवढा पाऊस पडतो म्हणजे जुलै महिन्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या १०६ टक्केपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. सांख्यिकीच्या टरसाईल वर्गीकृत श्रेणीनुसार म्हणजेच जुलै महिन्यातील (July Month) मासिक सरासरी पावसाइतका हापूस, किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Heavy Rain) होय. अशा त्या तीन श्रेणी होय. यात दोनच श्रेणी पात्र ठरल्या आहेत. व तिसरी श्रेणी म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता नाही.

 जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते, 

महाराष्ट्रातील मुंबई (Mumbai) शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक (Nashik), धुळे, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम,  वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के इतक्या पावसाची शक्यता जाणवते.                      दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या फलटण, माण खटाव, माळशिरस, पंढरपूर तालुक्याच्या भागात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६  टक्के  किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता खुपच अधिक जाणवते. जळगांव, संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, यवतमाळ व या जिल्ह्यात व जिल्ह्यांच्या लगतच्या परिसरात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीइतका म्हणजे ९६ ते १०४ टक्के  इतका पाऊस पडण्याची शक्यता जाणवते. 

कमाल तापमान-जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे ३ वाजेचे कमाल तापमान हे जुलैतील सरासरी कमाल तापमानापेक्षा पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. म्हणजे दिवसाचे अधिक तापमान म्हणून अधिक आर्द्रता त्यामुळेच जुलै महिन्यात पावसाची शक्यताही सरासरीपेक्षा अधिक जाणवणार आहे. 

किमान तापमानसंपूर्ण महाराष्ट्रात जुलै महिन्यात पहाटे ५ चे किमान तापमान हे सरासरीपेक्षा असण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजेच जुलै महिना पावसाळी असेल आणि आकाश नेहमी आभ्राच्छादित स्थितीतून किमान तापमानात वाढ जाणवणार आहे. 

' ला- निना '-सध्या एन्सो जुलै महिन्यात तटस्थेत असुन ऑगस्ट महिन्यात 'ला-निना डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी.  

' आयओडी ' (भारत महासागरीय द्वि-ध्रुविता)आतापर्यंत आयओडी धन होता. परंतु पुन्हा तटस्थेकडे झुकत आहे. त्यामुळे जुलैतल्या पावसासाठी अरबी समुद्र व बं. उपसागरातील पाणी तापमान समान असणे ही वातावरणीय स्थिती पावसास अटकाव करणारी नाही. ही सुद्धा जुलै महिन्यासाठी जमेचीच बाजू समजावी. 

आजची मान्सूनची स्थिती               मान्सूनने आज संपूर्ण देश वेळेआधी म्हणजे ६ दिवस अगोदर काबीज केला. मान्सून ट्रफ स्थापित झाला असुन सरासरी जागेपासून अधिक उत्तरेला आहे. अरबी समुद्रात कि. पट्टीसमोर दक्षिणोत्तर आस असुन गुजराथ भुभाग व द. किपट्टीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. पुढील ३ दिवस कोकण, विदर्भात जोरदार तर मध्य महाराष्ट्रात मध्यम तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. 

माणिकराव खुळे,Meteorologist (Retd.)IMD Pune.

टॅग्स :मोसमी पाऊसहवामानपाऊसमोसमी पावसाचा अंदाजमहाराष्ट्र