सध्याच्या कांदा,काढणी व साठवणीच्या तसेच आंबा, द्राक्षे, डाळिंब, संत्रा इ.फळबागा सौंद्यांच्या व काढणी, पॅकिंगच्या तयारीत तर भरड धान्यांची खळ्यावर धामधूम शेतकरी करत आहेत. मागील चार दिवसातील, म्हणजे दि.१६ ते २० मार्च दरम्यान विदर्भातील अवकाळीचे उदाहरण बघता, प्रत्यक्षात झालेले पर्ज्यन्य आणि गारपीट ही वातावरणीय अपेक्षेप्रमाणे मर्यादित क्षेत्रात व खुपच कमी तीव्रतेची व अंदाजित पूर्वानुमानानुसार झाल्याचे दिसून असल्याचे मत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी केले आहे.
गुरुवार दि.२८ ते रविवार ३१ मार्च दरम्यानच्या चार दिवसा (रंगपंचमी व नाथषट्ठी) पैकी फक्त एक-दोन दिवस विदर्भ मराठवाड्यात केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवेल, असे वाटते. तसेच शुक्रवार दि.१२ ते गुरुवार दि.१८ एप्रिलपर्यंतच्या आठवड्यात म्हणजे गुढीपाडवा झाल्यानंतर दोन दिवसांनी ते रामनवमीपर्यंत, मुंबईसह कोकण वगळता खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भातील फक्त काही भागात केवळ ढगाळ वातावरण राहून किंचित तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता, शिवाय अजुन तीन आठवडे हातात असुन शक्य असल्यास शेतकऱ्यांनी शेतकामाचे त्या पद्धतीने नियोजन करता येऊ शकते, असे वाटते. खुप अगोदर आगाऊ सूचना येथे केली आहे. तसेही वातावरणात जर काही बदल झाल्यास तसे सूचित केले जाईलच, असेही सांगण्यात आले आहे.
पहिले मार्गस्थ होत असतांनाच मंगळवार दि.२६ मार्चला रात्री नवीन पश्चिमी झंजावात, अतिउत्तर भारतातील पश्चिमी हिमालयीन राज्यात प्रवेशणार असुन तेथे पाऊस बर्फवृष्टी व थंडी जाणवेल. परिणामी महाराष्ट्रातही मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रातील कमाल किमान तापमाने सरासरी इतकी तर काही ठिकाणी सरासरीच्या खाली सध्या अजूनही जाणवत आहे. एल- निनोच्या वर्षात दोन्हीही तापमाने लाभदायक राहून महाराष्ट्रातील रब्बी पिकांना मदत तर केलीच व मार्चअखेरपर्यंत उभ्या पिकांना अजुनही फायदा होत आहे, असेच समजावे.
लेखक : जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे