Maharashtra Dam Storage : राज्यात दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून धरणांचा पाणीसाठा देखील स्थिर आहे. काही धरणांतून काही प्रमाणात विसर्ग सुरु आहे. सद्यस्थितीत जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 65 टक्के म्हणजेच 50 टी.एम.सी. च्या पुढे गेलेला असल्याने नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधुन पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. सध्या धरणांमधून किती विसर्ग सुरु आहे, हे पाहुयात....
जायकवाडीसाठी ३४ हजार दलघफू पाणी रवाना
नाशिक आणि नगरमधून १ जूनपासून २८ ऑगस्टपावेतो तब्बल ३४ हजार दलघफू पाणी जायकवाडीकडे रवाना झाले आहे. समन्यायी वाटप कराराप्रमाणे जायकवाडी ६५ टक्के भरल्यानंतर गोदावरीतून त्यासाठी पाणी सोडण्याची सक्ती करता येत नाही. जिल्ह्यासह नगरच्या धरणांमधून पाण्याचा होत असलेला विसर्ग पाहता जायकवाडी ६० टक्केपेक्षा जास्त भरले आहे. त्यामुळे मराठवाड्याचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
धरणातून सोडलेला / नदीत सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स) भंडारदरा धरण(प्रवरानदी)::१०५० कालवे::::::::::::::::::::: ००० निळवंडे धरण(प्रवरा नदी):::१४४७ *कालवे:::::::::::::::::::::::: ३३०देवठाण(आढळा नदी):::::::५०८ कालवे:::::::::::::::::::::::::०००भोजापुर(म्हाळुंगी):::::::::::५३९ कालवा::::::::::::::::::::१५२ओझर(प्रवरा नदी):::::::::::::४५४३कोतुळ(मुळा नदी):::::::::: ३४१६मुळाडॅम(मुऴा)::::::::::::::::::४००० कालवे::::::::::::::::::::::::::८०० गंगापुर:::::::::::::;::::::::: :१०५९ कालव्याद्वारे:::::::::::::::: :::०००दारणा::::::::::::::::::::::::::७०१० नां.मधमेश्वर(गोदावरी):::::::१८६१०कालवे- (जलद कालव्यासह)::०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग: ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग- कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग::००००हतनुर(धरण):::::::::::: २७४४०सीना(धरण)::::::::::::::::::: ०००० घोड(धरण):::::::::::::::::: ५७५० भाटघर (धरण ):::::::::::::::३५०० वीर(धरण)::::::::::::::::::::४६३७. दौंड ::::::::::::::::::::::::::::::३०८६३. उजनी ( धरण)::::::::::::::::४१६००. पंढरपूर:::::::::::::::::::::::९०,१२३राधानगरी:::::::::::::::: २९२८राजापुर बंधारा(कृष्णा)::::::९७८३३कोयना(धरण)::::::::::::: २००३९गोसी खुर्द (धरण)::::::::::::२३९८३ उर्ध्व वर्धा (अमरावती):::::::१३८०८. खडकवासला::::::::::: ४०७०. पानशेत::::::::::::::::::::::०००० जगबुडी नदी(कोकण)::::::०००० गडनदी(कोकण):::::::::::::१०५१-----
====================नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.भंडारदरा):::१९०/१९५११निळवंडे::::: ४३९/१८३७९मुळा:::::::: ५४०/२३७७८आढळा::::: ५०/१८३४ भोजापुर:::: ७९/२०६६जायकवाडी: ४.६८६४/५७.९७६३ (TMC)टी.एम.सी. (अंदाजे).
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य