Nashik Dam Storage :नाशिक जिल्ह्यात (Nashik District) जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या एक आणि दोन तारखेला समाधान कारक पाऊस (Rain) झाला. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने दडी मारली असून आजमितीला गंगापूर धरणात 21.03 टक्के पाणीसाठा आहे.
नाशिक जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांनी भात लागवडीसह इतर पिकांच्या लागवडीची तयारी केली आहे. मात्र दुसरीकडे पाऊस जेमतेम असल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊन ठेपला आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण 24 प्रकल्पात केवळ 8.15 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे नाशिक शहरासह सर्वच जिल्ह्ये पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सध्याचा पाणीसाठा किती?
आजच्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार कश्यपी 8.75 टक्के, गौतमी गोदावरी 10.87 टक्के, पालखेड 15.31 टक्के, दारणा 4.20 टक्के, भावली 9.14 टक्के, वालदेवी 5.21 टक्के, मुकणे 2.38 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 98.44 टक्के, चणकापुर 4.66 टक्के, हरणबारी 6.15 टक्के, केळझर 0.52 टक्के, गिरणा 11.95 टक्के तर पावसाचा जून महिना होऊनही ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, माणिकपुंज धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.
पाणीसाठा जेमतेमचं!नाशिक जिल्ह्यात जुलैच्या सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र आज सकाळपासून पुन्हा पावसाने उघडीप दिली आहे. मागील दोन-तीन दिवसाच्या पावसात अनेक नद्यांना पाणी आले. धरणांतही पाणीसाठा हळूहळू वाढत आहे. मात्र हा पाणीसाठा अद्यापही जेमतेम असल्याचे चित्र आहे.