Lokmat Agro >हवामान > Maharashtra Winter Update : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Winter Update : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Maharashtra Chance of pink winter in Maharashtra, know in detail  | Maharashtra Winter Update : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Winter Update : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Winter Update : पावसाची सांगता ऑक्टोबरअखेर जाणवते आहे. त्यामुळे लगेचच थंडीची चाहूल महाराष्ट्रात लागण्याची शक्यता जाणवते.

Maharashtra Winter Update : पावसाची सांगता ऑक्टोबरअखेर जाणवते आहे. त्यामुळे लगेचच थंडीची चाहूल महाराष्ट्रात लागण्याची शक्यता जाणवते.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Winter Update : गेल्या काही दिवसातील पावसाने शेतीचं (Heavy Rain) मोठं नुकसान केलं आहे. त्यातच हा पाऊस आता गुरुवारपर्यंत असल्याचे संकेत मिळाले आहे. तर दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात २९ ऑक्टोबरपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता हळूहळू थंडीची चाहूल लागण्याची शक्यता आहे. 

पावसाची सांगता ऑक्टोबरअखेर (October Hit) जाणवते आहे. आणि अजुनही ' ला- निना ' दृष्टिपथात नाही. त्यामुळे लगेचच थंडीची चाहूल (Winter Update) महाराष्ट्रात लागण्याची शक्यता जाणवते. येत्या आठवड्याभरात नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला या भागात थंडीला सुरवात होण्याचे संकेत मिळू लागले आहे.
                 
दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात मात्र ह्या आठवड्यात लगेच थंडी जाणवणार नाही. एक नोव्हेंबरनंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू थंडीत वाढ होवु शकते. जोपर्यंत 'ला- निना ' अवतरत नाही तोपर्यंत ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये थंडीची ही स्थिती कायमच टिकून राहू शकते, असे वाटते. 'ला- निना' च्या हजेरीनंतर होणाऱ्या वातावरणीय बदलानुसार थंडीचे चढ-उतार, त्या-त्या वेळी नक्कीच स्पष्ट करता येईल. 

सध्या काही ठिकाणी होतं असलेला पाऊस शेतकामासाठी काहीसा अडचणींचा ठरत असला तरी आता हा पाऊस रब्बीची हंगामाची शेतजमीन बैठक तयार करण्यास मदत करणारा आहे. 

- माणिकराव खुळे 
Meteorologist (Retd)
IMD Pune.

 

Web Title: Latest News Maharashtra Chance of pink winter in Maharashtra, know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.