Maharashtra Dam Storage : राज्यातील पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. मात्र अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. अशा स्थितीत मागील आठवडाभर झालेल्या धुवांधार पावसाने मात्र धरणांची स्थिती चांगली झाली आहे. आज सायंकाळच्या अहवालानुसार काही प्रमुख धरणाचा पाणीसाठा आणि विसर्ग कसा सुरु आहे, हे पाहुयात...
धरणातील दैनंदिन पाणीसाठा माहिती दि .२८/०८/२०२४ (सायंकाळी ६.००..वा )
भंडारदरा (एकुण) : १०,९३५ दलघफुट (९९.०६%) निळवंडे (एकुण) : ७६३६ दलघफुट (९१.६९%). मुळा (एकुण) : २४८१७ दलघफुट (९५.४५%) गंगापूर (उपयुक्त) : ५१४० दलघफुट (९१.३०%). दारणा (उपयुक्त) : ६८२३ दलघफुट (९५.४४%). जायकवाडी धरण (एकुण) ७७.२२ टीएमसी/ (७५.१७%) उपयुक्त::५१.१५ टीएमसी/ (६६.७३%).
जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा 65 टक्के च्या पुढे म्हणजेच 50 टीमच्या पुढे गेलेला आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायदा-२००५ नुसार जायकवाडी धरणात यापुढे पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही. अद्याप पावसाळा संपलेला नसून याप्रमाणे पाऊस सुरू राहिला तर कदाचित सप्टेंबर मध्येच जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने (१०२.७३ टीएमसी) भरण्याचा अंदाज आहे.
जायकवाडीत अहमद नगर व नाशिक जिल्ह्यांतील प्रमुख धरणांमधून सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स) भंडारदरा---- ६७६६ निळवंडे------९४९९. आढळा -------७८३ भोजापूर ------९९०. ओझर--------१०५२१ कोतुळ--------४२२७ मुळा धरण----६००० नांदूर मधमेश्वर (गोदावरी)-----२७९९०
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य