Lokmat Agro >हवामान > Maharashtra Dam Storage : राज्यात 'या' विभागात सर्वाधिक पाणीसाठा, वाचा तुमच्या जिल्ह्यातील धरणांत किती पाणी? 

Maharashtra Dam Storage : राज्यात 'या' विभागात सर्वाधिक पाणीसाठा, वाचा तुमच्या जिल्ह्यातील धरणांत किती पाणी? 

Latest News Maharashtra Dam Storage read how much water is in dams in your district see details | Maharashtra Dam Storage : राज्यात 'या' विभागात सर्वाधिक पाणीसाठा, वाचा तुमच्या जिल्ह्यातील धरणांत किती पाणी? 

Maharashtra Dam Storage : राज्यात 'या' विभागात सर्वाधिक पाणीसाठा, वाचा तुमच्या जिल्ह्यातील धरणांत किती पाणी? 

Maharashtra Dam Storage : त्याचबरोबर राज्यातील कुठल्या विभागातील किती पाणीसाठा झाला आहे, हे सविस्तर पाहुयात.. 

Maharashtra Dam Storage : त्याचबरोबर राज्यातील कुठल्या विभागातील किती पाणीसाठा झाला आहे, हे सविस्तर पाहुयात.. 

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Dam Storage :  महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आजच्या पाणी साठ्याच्या अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती पाणीसाठा, तसेच कुठल्या धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे. त्याचबरोबर राज्यातील कुठल्या विभागातील किती पाणीसाठा झाला आहे, हे सविस्तर पाहुयात.. 

नागपूर विभागातील पाणीसाठा 

त्यानुसार नागपूर विभागातील भंडारा जिल्ह्यातील बावनथडी धरणात 57.26 टक्के, गोसीखुर्द धरणामध्ये 35.27 टक्के, जलसाठा जलसाठा तयार झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा धरण आणि गडचिरोली जिल्ह्यातील दिना धरण 100 टक्के भरले आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी खैरी धरण 100 टक्के, खिंडसी धरण 86.06 टक्के, नांद धरण 50.71 टक्के , तोतलाडोह धरण 88.78 टक्के, वडगाव धरण 69.26 टक्के, तर गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा धरण 20.9 टक्के इटियाडोह धरण 100 टक्के कालीसरार धरण 75.88 टक्के पुजारी टोला धरण 71.03 टक्के,  सिरपूर धरण 80.10 टक्के, तसेच वर्धा जिल्ह्यातील बोर धरण 67.58 टक्के, निम्न वर्धा धरण 55.75 टक्के असा एकूण नागपूर विभागातील धरण साठा 71.37 टक्के झाला आहे.

अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरण 84.12 टक्के,  वान धरण 48 टक्के, अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा धरण 78.27 टक्के, बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरण शून्य टक्के नळगंगा धरण 37.19 टक्के तर पेनटाकळी धरण 15.44 टक्के भरले आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील पाणीसाठा  

छत्रपती संभाजी नगर विभागातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आपेगाव धरण 14.57 टक्के तर पैठण जायकवाडी धरण 13.10 टक्के
बीड जिल्ह्यातील बोरगाव अंजनपुर धरण शून्य टक्के, धनेगाव धरण 63.21 टक्के, डोंगरगाव धरण 66.16 टक्के माजलगाव धरण शून्य टक्के, मांजरा धरण 2.32 टक्के, रोशन पुरी धरण 41.11 टक्के, सिरसमार्ग धरण 0 टक्के, वांगदरी धरण 35.71 टक्के, तर हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण 43.03% येलदरी धरण 32.95% नांदेड जिल्ह्यातील आमदुरा धरण 66.0% ढालेगाव धरण 30 ,दिगडी धरण 2.39 टक्के, दिग्रस धरण 68.95 टक्के, हिरडपपुरी धरण 3.10 टक्के, जोगलादेवी धरण 16 टक्के किनवट धरण 2.55 टक्के, लोणी सांगवी धरण 25.18 टक्के, निम्न मनार धरण 66.57 टक्के, मंगरूळ धरण 13.52 टक्के, मुदगळ धरण 79.49 टक्के, राजाटाकळी 13.32 टक्के, विष्णुपुरी 79.94 टक्के 

तर धाराशिव जिल्ह्यातील औराद धरण 5.18 टक्के गुंजाळगा धरण 74.45 टक्के, किल्लारी धरण 71.54 टक्के निम्न तेरणा धरण 29.76 टक्के राजेगाव धरण 81.36 टक्के, सीना कोळेगाव धरण 0 टक्के. लातूर जिल्ह्यातील भुसाणी धरण 75.12 टक्के, कारसा पोहरे गाव धरण 38.12 टक्के, नागझरी धरण 50.86 टक्के, शिवणी धरण 52.20 टक्के, टाकळगाव देवळा धरण 48.63 टक्के, परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना धरण 9.75 टक्के,  असा एकूण छत्रपती संभाजी नगर विभागातील धरणांमध्ये 20.63 टक्के जलसाठा आहे.

नाशिक विभागातील धरणसाठा 
नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण 92.97 टक्के, मुळा धरण 72.47 टक्के, निळवंडे 02 धरण 88.34 टक्के, जळगाव जिल्ह्यातील उर्ध्व तापी हतनुर धरण 28.39 टक्के, वाघुर धरण 64.78 टक्के, नाशिक जिल्ह्यातील अर्जुन सागर धरण 48.69 टक्के, भाम धरण 100 टक्के, भावली धरण 99.58 टक्के, चनकापूर धरण 58.51 टक्के, दारणा धरण 84.27 टक्के, गंगापूर धरण 85.87 टक्के, गिरणा धरण 25.95 टक्के, कडवा धरण 81.59 टक्के, करंजवण धरण 55.94 टक्के, मुकणे धरण 52.84 टक्के, ओझरखेड धरण 63.93 टक्के, पालखेड धरण 63.93 टक्के, पुणे गाव धरण 77.46 टक्के, तिसगाव धरण 6.50 टक्के, वैतरणा धरण 83.27 टक्के, वाघार धरण 72.83 टक्के, वाकी धरण 69.35 टक्के असा एकूण नाशिक विभागातील धरण साठा 65 टक्के झाला आहे.

पुणे विभागातील जलसाठा 

पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरण 86.48 टक्के, राधानगरी 98.10 टक्के, किल्लारी धरण 19.83 टक्के, तर तुळशी धरण 95.18 टक्के, पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर धरण 94.44 टक्के, डिंभे धरण 94.64 टक्के, भामा आसखेड धरण 94.6 टक्के, येडगाव धरण 74.21 टक्के, चासकमान धरण 95.44 टक्के, माणिक डोह धरण 44.90 टक्के, पावना धरण 81.36 टक्के, भाटघर धरण 99.56 टक्के, खडकवासला धरण 68.56 टक्के, पानशेत धरण 91.99 टक्के, गुंजवणी धरण 89.52 टक्के, टेमघर धरण 100 टक्के, मुळशी टाटा धरण 95.96 टक्के, सांगली जिल्ह्यातील वारणा धरण 80.61 टक्के, धोम धरण 81.40 टक्के, कोयना धरण 81.6 टक्के, वीर धरण 92.47 टक्के, सोलापूर जिल्ह्यातील भीमा उजनी धरण 98.23 टक्के असा एकूण पुणे विभागातील 86.32 टक्के धरण साठा जमा झाला आहे.

कोकण विभागातील जलसाठा 

कोकण विभागातील पालघर जिल्ह्यातील धामणी धरण 92.67 टक्के, कवडास धरण 87.55 टक्के तर मध्य वैतरणा धरण 96.37 टक्के, रायगड जिल्ह्यातील ढोल वाहल धरण 57.69 टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्लारी धरण 84.76 टक्के, ठाणे जिल्ह्यातील बारावी धरण 94.16 टक्के,  भातसा धरण 91.53 टक्के,  मोडक सागर धरण 99.97 टक्के, तानसा धरण 99.39 टक्के, ऊर्ध्व घाटघर धरण 41.5 टक्के असा एकूण कोकण प्रदेशातील धरणांत 92.7 टक्के धरण साठा जमा झाला आहे. तर राज्यातील सर्व विभाग मिळून जवळपास 69.98 टक्के, जलसाठा जमा झाला आहे.

.

Web Title: Latest News Maharashtra Dam Storage read how much water is in dams in your district see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.