Join us

Maharashtra Monsoon Update : पुढील आठवड्यात 'या' जिल्ह्यात वळीव पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 7:01 PM

Monsoon Update : पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यात पूर्व मोसमी गडगडाटी वळीव पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Maharashtra Monsoon Update : वातावरणात सातत्याने बदल होत असून मान्सून (Monsoon 2024) देखील काही दिवसात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आता सोमवार दि. ३ जून पासून आठवडाभर म्हणजे शुक्रवार १० जूनपर्यंत महाराष्ट्रातील (Maharashtra Monsoon Update) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर,, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली या ९ जिल्ह्यात फक्त पूर्व मोसमी गडगडाटी वळीव पावसाची (rain) शक्यता जेष्ठ निवृत्त  तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.                 महाराष्ट्रातील उर्वरित २७ जिल्ह्यात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) राहून तुरळक ठिकाणी फक्त किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह (mumbai) कोकणात मात्र ढगाळ वातावरणसह पुढील ३ दिवस दमटयुक्त उष्णतेचाही अनुभव येईल. येत्या ४ ते ५ दिवसात मान्सून कदाचित कर्नाटक किनारपट्टीपर्यंत पोहोचू शकतो. पण त्यानंतर त्याची प्रगती कदाचित धिम्या गतीनेही होवु शकते असे वाटते.                  'रेमल ' चक्रीवादळाच्या अवशेषाच्या परिणामा मुळे वातावरणीय घडामोडीतून, जरी मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळाच्या टोकावर ३० मे ला पोहोचला असला तरी, महाराष्ट्रात तो सरासरीच्याच तारखेला म्हणजे मुंबईत १० जून दरम्यानच पोहोचण्याची शक्यता जाणवते. 

पेरणी तर होणारच....                  सध्याची एकंदरीत वातावरणीय स्थिती पाहता,  पूर्वमोसमी व मान्सूनच्या सरींच्या शक्यतेनुसार महाराष्ट्रात शेतकऱ्यांना खरीप पेर तयारीसाठी शेतमशागती व त्यानंतर पेरणीसाठीच्या आवश्यक जमीन ओलीसाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे साधारण २० जून दरम्यान पर्यंतही कदाचितवाट पहावी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे वाटते. पेरणी तर होणारच आहे, पण सध्याच्या ह्या वातावरणीय पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी अति आत्मविश्वासावर, उगाचच धूळ-पेरणी वा बाठर ओलीवर पेरणीचे धाडस करू नये, असे वाटते. 

लेखक :माणिकराव खुळे, जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ, पुणे आयएमडी  

टॅग्स :हवामानपाऊसशेती क्षेत्रमोसमी पावसाचा अंदाज