Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात गारपीटीची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात गारपीटीची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Maharashtra Rain Update Chance of hailstorm in ten districts of Madhya Maharashtra, know in detail  | Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात गारपीटीची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात गारपीटीची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Rain) तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस होत असुन बुधवार दि. २३ ऑक्टोबरपर्यंत या पावसाची शक्यता कायम आहे.

Maharashtra Rain Update : संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Rain) तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस होत असुन बुधवार दि. २३ ऑक्टोबरपर्यंत या पावसाची शक्यता कायम आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain Update : ऑक्टोबर महिन्याच्या (October Rain) तिसऱ्या आठवड्यातील  पावसाचे दि.२३ ऑक्टोबरपर्यंतच्या सात दिवसा (१७ ते २३ ऑक्टोबर) दरम्यानचे दुसऱ्या आवर्तनात संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Rain) तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस होत असुन बुधवार दि. २३ ऑक्टोबरपर्यंत या पावसाची शक्यता कायम आहे.
               
विशेष. म्हणजे आज शनिवार दि. १९ ऑक्टोबर पासून पुढील दोन दिवस म्हणजे १९-२० ऑक्टोबर (शनिवार- रविवार) दरम्यान खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट (Hailstorm) होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

         
गारपीटीची शक्यता कशामुळे निर्माण झाली?
              
i) रत्नागिरी जिल्ह्याच्या समोर खोल अरबी समुद्रात व थायलंडच्या पश्चिम किनारपट्टीसमोर बं. उपसागरातील दोन्हीही समुद्रातील चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीतून सह्याद्रीच्या पूर्व बाजूला संपूर्ण मध्य महाराष्ट्रादरम्यान होणारा वाऱ्यांचा संयोग तसेच,
            
ii) मध्य तपांबरात म्हणजे समुद्र सपाटीपासून ५.८ किमी. उंचावर तयार झालेला 'व्हर्टिकल विंड शिअर ' (एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या असमान वेगवान वाऱ्याचा व्हर्टिकल शिअर झोन)
            
iii) मध्य तपांबरात म्हणजे समुद्र सपाटीपासून ५.८ किमी. उंचावर, उत्तर दिशेकडून २० डिग्री अक्षवृत्त दक्षिणेपर्यंत सरकलेले बळकट पश्चिमी वारे या  वातावरणीय घडामोडीमुळे गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे. 


- माणिकराव खुळे 
Meteorologist (Retd)
IMD Pune.

                  

Web Title: Latest News Maharashtra Rain Update Chance of hailstorm in ten districts of Madhya Maharashtra, know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.