Join us

Maharashtra Rain Update : विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, उर्वरित महाराष्ट्रात परिस्थिती कशी? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 6:54 PM

Maharashtra Rain Update : विदर्भ वगळता, मुंबई कोकणसहित संपूर्ण महाराष्ट्रात रविवार दि. २५ ऑगस्ट पर्यन्त मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते.

Maharashtra Rain Update : विदर्भ (Vidarbha Rain) वगळता, मुंबई कोकणसहित संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Rain) रविवार दि. २५ ऑगस्ट पर्यन्त मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते.  मराठवाड्यात मात्र पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार २२ ऑगस्ट पर्यंतच मध्यम पावसाची शक्यता जाणवते. त्यानंतर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र आजपासूनच संपूर्ण आठवडा. म्हणजे रविवार दि. २५ ऑगस्ट पर्यन्त जोरदार पावसाची शक्यता जाणवते. 

वाढलेली उन्हाची ताप अजूनही कायम जाणवू शकते.               संपूर्ण महाराष्ट्रात पुढील ३ दिवस म्हणजे मंगळवार दि. १९ ऑगस्टपर्यन्त दुपारचे ३ चे कमाल तापमान हे  ३२ डिग्री से.ग्रेड च्या आसपास म्हणजे  सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते ६ डिग्री से.ग्रेड ने अधिक जाणवू शकते. विशेषतः संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील छ. सं. नगर जालना बीड धाराशिव अश्या २१ जिल्ह्यात तर हे तापमान सरासरीपेक्षा ५ ते ६ डिग्रीने अधिक जाणवेल. उर्वरित मराठवाडा व संपूर्ण विदर्भातील १५ जिल्ह्यात हे तापमान २ ते ३ डिग्रीने अधिक जाणवेल. मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सातारा या ८ जिल्ह्यात उन्हाची काहिली अधिक जाणवणार असल्याचे दिसून येते. 

भयंकर उकाडा कशामुळे

पावसाळी हंगामात अरबी समुद्रावरून वाहणारे वारे पश्चिमी वाऱ्यांची दिशा बदलून वाऱ्यांचा वहन पॅटर्न ३ किमी. उंचीपर्यंत पूर्णपणे ९० अंशांत बदलून महाराष्ट्रावर वारे सध्या ते उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहे. शिवाय हंगामाप्रमाणे भाग बदलत प्रत्येक काही अंतरावर अपेक्षित असलेला हवेच्या दाबातील फरक सध्या नामशेष झाला आहे . केवळ एकसमान जाणवत असलेला १००६ मिलिबार ( हेक्टपासकल) इतका हवेचा दाब जाणवत आहे. वाऱ्याचा वेग मंदावला आहे. हवेला वहन नाही. हवेचे पार्सल एकजिनसी बंधित होवून उष्णतेचे संचयन त्यात घडून येत आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रावर प्रेशर ग्रेडीएन्ट -हवेच्या दाबाची चढ-उताराची क्रमिकता,  किंवा - हवेच्या दाबाचा ढाळ किंवा चढ पूर्णपणे नामशेष झाली आहे.  शिवाय ढगाळ वातावरणामुळे रात्रीची जमिनीतून बाहेर पडणाऱ्या उष्णतेला अटकाव होत आहे. ह्या परिणामातून सध्या महाराष्ट्रात उकाडा जाणवत आहे.

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd)IMD Pune.

टॅग्स :पाऊसहवामानमहाराष्ट्रविदर्भमोसमी पाऊस