Join us

Maharashtra Rain Update : पिकांना ओढ बसण्याची शक्यता, काय सांगतोय पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर   

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 7:10 PM

Maharashtra Rain Update : 'उष्णता संवहनी' प्रक्रियेतून वीजा व गडगडाटीसह तुरळक ठिकाणीच केवळ हलक्या ते मध्यमच पावसाची शक्यता जाणवते.

Maharashtra Rain Update :  काल मंगळवार दि. १३ ऑगस्टला ८ (ठाणे, पालघर, रायगड, उपनगर, मुंबई, पुणे, नगर, सातारा) जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान हे  ३२ डिग्री से.ग्रेड च्या आसपास म्हणजे भाग बदलत सरासरीपेक्षा  ३ ते ६ डिग्री से.ग्रेड ने अधिक जाणवले. वर स्पष्टीत ८ जिल्ह्यात मात्र हेच तापमान २६ ते २८ डिग्री से.ग्रेड दरम्यान होते.            कमाल तापमानाची (Temprature) ही स्थिती कदाचित कमी जास्त प्रमाणात २५ ऑगस्टपर्यंतही राहू शकते. त्यामुळे हवेत दमटपणा जाणवून खरीप पिकांना पाण्याची ओढ बसु शकते. शिवाय वाढत्या दमटपणातून पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.        कमाल तापमान वाढ व भारत महासागर वि्षुववृत्तीय परिक्षेत्रात,  एम.जे.ओ. च्या उपस्थितीत पुढील १०- १२ दिवस म्हणजे २५ ऑगस्टपर्यन्त विदर्भ वगळता  उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात शक्यतो दुपारनंतर, मर्यादित क्षेत्रावर, 'उष्णता संवहनी' प्रक्रियेतून वीजा व  गडगडाटीसह  तुरळक ठिकाणीच केवळ हलक्या ते मध्यमच पावसाची शक्यता जाणवते. ह्यामुळेच कदाचित पिकांना ओढ बसण्याची शक्यता जाणवते. विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र शनिवार दि १७ ऑगस्टपासून जोरदार पावसाची शक्यता जाणवते. 

वातावरणात बदल जाणवल्यास तसा खुलासा होईलच.

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd.)IMD Pune.

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसशेती क्षेत्रशेती