Maharashtra Rain Update : ऑक्टोबर महिन्यातील (October Rain) दुसऱ्या व शेवटच्या पावसाच्या आवर्तनातून, मंगळवार दि.२९ ऑक्टोबर (धनत्रयोदशी) ते सोमवार दि. ४ नोव्हेंबरपर्यंतच्या दिवाळीच्या सप्ताहात महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित वीजा, गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
मंगळवार दि.२९ (धनत्रयोदशी) ला....
मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील ४ जिल्ह्यात फक्त ढगाळ तर उर्वरित जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण (Climate) जाणवेल.
बुधवार दि.३० ऑक्टोबरला ...
रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर अश्या तीन जिल्ह्यात फक्त ढगाळ वातावरण (Cloudy weather) तर अकोला, वर्धा, नागपूर येथील तीन जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित किरकोळ पाऊस तर तीस उर्वरित जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.
गुरुवार दि.३१ ऑक्टोबरला...
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संपूर्ण विदर्भ (नागपूर, अमरावती वगळता), उत्तर नगर व उत्तर संभाजीनगर, आणि पुणे व सातारा (घाटमाथा) येथील १५ जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित किरकोळ पाऊस तर उर्वरित २१ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.
शुक्रवार दि.१ नोव्हेंबरला...
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, नगर व उत्तर सं.नगर, लातूर नांदेड परभणी आणि नाशिक पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा अश्या १२ जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित किरकोळ पाऊस तर उर्वरित २४ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.
शनिवार दि.२ नोव्हेंबरला...
मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी अशा १३ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित किरकोळ पाऊस तर उर्वरित २३ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.
रविवार दि. ३ नोव्हेंबरला...
रत्नागिरी सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड येथील १२ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित किरकोळ पाऊस तर उर्वरित २४ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.
सोमवार दि. ४ नोव्हेंबरला...
पुणे, सातारा, नगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड येथील ७ जिल्ह्यात फक्त ढगाळ वातावरण तर उर्वरित २९ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.
उत्तर महाराष्ट्रात पाऊस नाही
दरम्यानच्या सप्ताहातील (मंगळवार दि.२९ ऑक्टोबर (धनत्रयोदशी) ते सोमवार दि. ४ नोव्हेंबरपर्यंतच्या) काळात ठाणे, पालघर, नाशिक व खान्देशातील अशा ६ जिल्ह्यात तसेच संपूर्ण विदर्भात शुक्रवार दि. १ नोव्हेंबरनंतर वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता असल्यामुळे येथे थंडीची चाहूल लागू शकते.
सध्या ऑक्टोबर हिट जाणवते पण लवकरच थंडीची चाहूल -
सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान सरासरी इतके म्हणजे ३३ डिग्री से. ग्रेडच्या आसपास आहे. तर पहाटेचे किमान तापमान मात्र भाग बदलत सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्री से. ग्रेड ने अधिक म्हणजे २२ डिग्री से. ग्रेडच्या आसपास आहे. त्यामुळे अजुन ऑक्टोबर हिटचा परिणाम टिकून आहे. परंतु मंगळवार दि. ५ नोव्हेंबर पासून निरभ्र आकाशासहित संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू थंडीला सुरवात होवु शकते, असे वाटते.
महाराष्ट्रात कशामुळे पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे?
समुद्र सपाटीपासून दिड किमी. उंचीवर उत्तर भारतातून येणारे उत्तरी व पूर्व भारतातून येणारे ईशान्यई असे कोरडे वारे तर बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे यांचा दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात होणाऱ्या मिलाफातून सध्या महाराष्ट्रात आठवडाभरासाठी पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे.
- माणिकराव खुळे
Meteorolohist (Retd )
IMD Pune.