Maharashtra Rain Update : सध्या भारत महासागर वि्षुववृत्तीय परिक्षेत्रात असलेली एम.जे.ओ. ची उपस्थिती आणि सध्या होत असलेली कमाल तापमानातील वाढ, ह्यामुळे पुढील संपूर्ण सप्ताहात म्हणजे रविवार २५ ऑगस्टपर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात शक्यतो दुपारनंतर, 'उष्णता संवहनी' प्रक्रियेतून वीजा व गडगडाटीसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
तारखेनुसार खालील विविध जिल्ह्यात मात्र जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता ह्या सप्ताहात असु शकते.
२० ऑगस्ट - नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर - असे ११ जिल्हे
२१ ऑगस्ट -मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ-अठरा जिल्हे
२२ व २३ऑगस्ट- नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, कोल्हापूर व मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ - असे २३ जिल्हे
२४-ऑगस्ट- नंदुरबार, धुळे, जळगांव, कोल्हापूर, छ. सं.नगर, जालना, हिंगोली, परभणी व मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ - असे २६ जिल्हे
२५ ऑगस्ट - मराठवाडा वगळता महाराष्ट्रातील २८ जिल्हे (मराठवाड्यात मात्र २५ ला मध्यम पाऊस)
महाराष्ट्रातील सर्व धरणक्षेत्रातील जल-आवकेत पुन्हा वेगाने वाढ होवु शकते.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.