Join us

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील 'या' अठरा जिल्ह्यात पाऊस काहीसा उघडण्याची शक्यता, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 6:13 PM

Maharashtra Rain Update : आज आणि उद्या देखील पावसाचा जोर कायम असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर..

Maharashtra Rain Update : गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस (HeavyRain) सुरु आहे. त्यामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. आज आणि उद्या देखील पावसाचा जोर कायम असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर उद्यानंतर पुढील आठवडाभर पावसाच्या (Weather Update) उघडिपीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

                 पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता 

उद्या शनिवार दि. २८ सप्टेंबरपासून आठवडाभर म्हणजे शनिवार दि. ५ ऑक्टोबरपर्यंत खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर व मराठवाड्यात अशा १८ जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून हळूहळू पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. केवळ अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असु शकते. मुंबईसह कोकण व विदर्भातील १८ जिल्ह्यात मात्र अशा प्रकारची उघडीपीची परिस्थिती ही १ ते ५ ऑक्टोबर दरम्यानच्या पाच दिवसात जाणवू शकते असे वाटते. 

पुर परिस्थितीची तीव्रता वाढण्याची शक्यता. येत्या तीन दिवसात  कोकणातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे व उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा ७ जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा ६ जिल्ह्यात अशा एकूण १३ जिल्ह्यातील तापी, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात मात्र पूरपाण्याची तीव्रता वाढू शकते, असे वाटते. 

ऑक्टोबरमधील पाऊस सहा ऑक्टोबरनंतर पुन्हा पावसाची सक्रियता वाढून १३ ऑक्टोबरपर्यंत म्हणजे आठवडाभर महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. 

 मान्सून चे निर्गमन ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे १६ ऑक्टोबरनंतर मान्सून केंव्हाही निरोप घेऊ शकतो. अर्थात मान्सून निघून गेला तरी चक्रीवादळाचा सीझन चालु होत असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याअखेर दरम्यानही महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारता येत नाही. 

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd)IMD Pune.

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसशेती क्षेत्रशेती