Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain Update : कृष्णा, कोयना व गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात पूर पाण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : कृष्णा, कोयना व गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात पूर पाण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Latest News maharashtra rain update Chances of flood water in Krishna, Koyna and Godavari river valleys, know in detail  | Maharashtra Rain Update : कृष्णा, कोयना व गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात पूर पाण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : कृष्णा, कोयना व गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात पूर पाण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : आजपासून राज्यातील काही भागात पावसाने (Maharashtra Rain) दमदार कमबॅक केले आहे.

Maharashtra Rain Update : आजपासून राज्यातील काही भागात पावसाने (Maharashtra Rain) दमदार कमबॅक केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain Update : आजपासून राज्यातील काही भागात पावसाने (Maharashtra Rain) दमदार कमबॅक केले आहे. उत्तर महाराष्ट्रासह, मुंबई, कोकण आदी भागात पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे कृष्णा, कोयना गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात पूर पाणी येण्याची शक्यता आहे. 

      
परतीचा पाऊस -
                 
अति वायव्य राजस्थान, व कच्छ परिसरातून वायव्यई वारा, खालावणारी आर्द्रता व  प्रत्यावर्ती वाऱ्याची स्थिती या बदलानुसार, आज सोमवार दि. २३ सप्टेंबरपासून मान्सून राजस्थान कच्छमधून परतण्यास सुरवात झाली आहे. 
              
जोरदार पाऊस -
                  
सप्टेंबरच्या शेवटच्या व तिसऱ्या (२३ ते २७ दरम्यानच्या) आवर्तनात आजपासुन पुढील पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात  वीजा व गडगडाटीसह जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. अंदाजे ७ सेमी. किंवा त्यापेक्षा अधिक व १२ सेमी. च्या खाली अश्या श्रेणीतील एका दिवसात होवु शकणाऱ्या पावसाला जोरदार पाऊस संबोधतात. 
             
अतिजोरदार पाऊस -
                   
या पावसाची तीव्रता खान्देश, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्जन्यच्छायेतील प्रदेशात जोरदार तर विशेषतः गुरुवार दि.२६ सप्टेंबर ला मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. अंदाजे १२ ते २० सेमी. दरम्यानच्या श्रेणीतील एका दिवसात होवु शकणाऱ्या पावसाला अतिजोरदार पाऊस संबोधतात. 
            
शेतकामांचे नियोजन -
                 
मंगळवार व गुरुवार (२४, २६ सप्टेंबर) ला शेतपिके काढणी व शेत मशागतीला पावसामुळे अडचणी निर्माण येऊ शकतात, असे वाटते. शेतकऱ्यांनी शेतकामाचे नियोजन त्याप्रमाणे करावे असे वाटते. शनिवार दि. २८ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर काही दिवसाकरिता कमी होईल, असे वाटते. 


- माणिकराव खुळे 
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Web Title: Latest News maharashtra rain update Chances of flood water in Krishna, Koyna and Godavari river valleys, know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.