Lokmat Agro >हवामान > Purva Nakshtra : मघा जोरदार बरसले, पूर्वा नक्षत्रात पाऊस कसा असेल? वाचा सविस्तर 

Purva Nakshtra : मघा जोरदार बरसले, पूर्वा नक्षत्रात पाऊस कसा असेल? वाचा सविस्तर 

Latest News Maharashtra Rain Update how will rain be in Purva Nakshtra Read in detail  | Purva Nakshtra : मघा जोरदार बरसले, पूर्वा नक्षत्रात पाऊस कसा असेल? वाचा सविस्तर 

Purva Nakshtra : मघा जोरदार बरसले, पूर्वा नक्षत्रात पाऊस कसा असेल? वाचा सविस्तर 

Purva Nakshtra : यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत पुष्य आणि त्यापाठोपाठ मघा नक्षत्रानेच आपली तडाखेबंद सलामी दिलेली आहे.

Purva Nakshtra : यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत पुष्य आणि त्यापाठोपाठ मघा नक्षत्रानेच आपली तडाखेबंद सलामी दिलेली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Purva Nakshtra : कोल्हा या वाहनावर स्वार होऊन आलेले मघा नक्षत्र (Magha Nakshatra) फारसे बरसणार नाही, असे आडाखे बांधले गेले असताना या नक्षत्राने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. या नक्षत्रात या हंगामातील सर्वाधिक अशी २००.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. नशिक जिल्ह्यातील (Nashik Rain) सर्व तालुक्यांत आतापर्यंत सरासरीने शंभरी ओलांडली असताना पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी व पेठ तालुक्यात अद्यापही सरासरी गाठलेली नाही. 

दरम्यान, मघा नक्षत्राच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत पुष्य आणि त्यापाठोपाठ मघा नक्षत्रानेच आपली तडाखेबंद सलामी दिलेली आहे. सुरुवातीची मृग, आर्द्रा आणि पुनर्वसू या नक्षत्राने फारशी समाधानकारक कामगिरी न केल्याने खरिपाच्या हंगामावर संकट घोंघावत होते. परंतु, पुष्य नक्षत्राने चांगलाच हात दिला आणि या नक्षत्रात १६३.५ मि.मी. पावसाची नोंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर आश्लेषा नक्षत्राने निराशा केली. या नक्षत्रात १०६.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. 

आश्लेषानंतर कोल्हा या वाहनावर स्वार होऊन आलेल्या मघा नक्षत्रात पाऊस काही भागात हुलकावणी तर काही भागात जोरदार वृष्टी होण्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तविला होता. त्यामुळे या नक्षत्रातही शेतकऱ्यांना आभाळाकडे नजरा कराव्या लागतात की काय, अशी भीती होती, परंतु, मघा नक्षत्राने जिल्ह्यावर कृपावृष्टी केली आणि या नक्षत्रात तब्बल सरासरी २०० मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी या नक्षत्रात पावसाने समाधानकारक कामगिरी बजावली नव्हती. या नक्षत्रात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शंभर मि.मी. पेक्षाही अधिक पाऊस झाला. 

इतर तालुक्यात किती पाऊस? 

त्यात मालेगाव तालुक्यात १३६.२ मि.मी., बागलाण १९७.७, कळवण २२४, नांदगाव १४९, सुरगाणा ५४९.६, नाशिक १७७.७, दिंडोरी २७२.३, इगतपुरी ३७८.८, पेठ ३९०.१, निफाड ३५३.९, सिन्नर १४६, येवला १०५, चांदवड १३७.५, त्र्यंबकेश्वर ४०१.२ व देवळा १४६.६ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात अद्यापही पेठ व इगतपुरी तालुक्यात पावसाने आपली सरासरीची शंभरी ओलांडलेली नाही. इगतपुरी तालुक्यात ६०.८ टक्के, तर पेठ तालुक्यात ९३.१ टक्के पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०० टक्के पाऊस झाला असून, मागील वर्षी याच कालावधीपर्यंत ५३ टक्के पाऊस झाला होता.

पूर्वा नक्षत्रात मराठवाडा भिजणार 
मघा नक्षत्राने दमदारपणा दाखविल्यानंतर आता ३० ऑगस्ट रोजी सूर्याने पूर्वा नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. दाते पंचांगकर्त्यांच्या मते या नक्षत्रात रवि, बुध, शुक व शनि हे जलनाडीत असून, ८ सप्टेंबरची रवि, शनि प्रतिवृती व ग्रहमानाचा विचार करता पर्जन्यमान मध्यम राहील. या नक्षत्रात दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात बऱ्यापैकी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या २, ३, ६, ७ व ८ सप्टेंबरला पाऊस अपेक्षित आहे. 

Web Title: Latest News Maharashtra Rain Update how will rain be in Purva Nakshtra Read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.