Join us

Maharashtra Rain Update : दसऱ्यापासून पाच दिवस 'या' जिल्ह्यांत पावसाचा अंदाज काय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 6:12 PM

Maharashtra Rain Update : उद्यापासून पाच दिवस राज्यातील 'या' अठरा जिल्ह्यात पावसाचा अंदाज काय सांगितला आहे, ते पाहुयात..

Maharashtra Rain Update : उद्या शनिवार दि.१२ ऑक्टोबरपासून पुढील ५ दिवस म्हणजे मंगळवार दि. १६ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर अशा १८ जिल्ह्यात व विदर्भात १३ ते १५ ऑक्टोबर (३ दिवस) ११ जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण (Cloudy Weather) राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची (Light Rain) शक्यता जाणवते.                 त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वाफसा असेल, त्या शेतकऱ्यांनी पावसाची विशेष भिती न बाळगता शेत कामाचा उरक साधण्यास हरकत नाही, असे वाटते. बुधवार दि १७ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात (Maharashtra Rain Update) पुन्हा काहीसं पावसाळी वातावरण चित्रित होण्याची शक्यता जाणवते. अर्थात त्यावेळच्या पावसाच्या तीव्रतेचा सविस्तर खुलासा त्यावेळी होईलच.          परतीचा अजुन मान्सून जागेवरच?                            शनिवार दि. ५ ऑक्टोबरला परतीच्या वाटेवरील मान्सून अजूनही केवळ महाराष्ट्र राज्याच्या उंबरठ्यावर म्हणजे नंदुरबार पर्यन्त फक्त येऊन थांबलेला आहे. आज सप्ताह उलटला तरी अजुन तो नंदुरबारमध्येच उभा आहे. अर्थात त्याच्या पुढील वाटचालीस अनुकूलता असली तरी प्रत्यक्षात जेंव्हा तो जाग्यावरून हलेल, तेंव्हाच. महाराष्ट्रातील परतीच्या पावसाबाबत बोलणं योग्य ठरेल, असे वाटते. 

गारपीट नाही.....                          सध्याच्या वातावरणानुसार महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता नाही. त्यामुळे गारपीटीबाबत पसरवल्या जाणाऱ्या व शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण करणाऱ्या बातम्याकडे दुर्लक्ष करावे, असे वाटते.

मग उन्हाळ कांदा बियाणं (हुळं) टाकावे का?                                 नवीन उन्हाळ गावठी हुळं १२ ऑक्टोबर नंतरच टाकण्यास हरकत नसावी असे वाटते. कारण दि.१२ किंवा दि.१७ ऑक्टोबर नंतर जरी किरकोळ पाऊस झाला तरी हुळं उताराला विशेष अपायकराकता जाणवणार नाही, असे वाटते. अर्थात शेवटी निर्णय शेतकऱ्यांनी स्वतःच आपल्या विवेकावर घ्यावा, असे वाटते. 

- माणिकराव खुळे Meteorogist (Retd)IMD Pune.

टॅग्स :पाऊसहवामानमहाराष्ट्रमोसमी पाऊस