Join us

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील 'या' भागात पुढील पाच दिवस किरकोळ पावसाची शक्यता, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 20:10 IST

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आज मंगळवार दि. १८ ते शनिवार दि. २२ मार्च दरम्यानच्या पाच दिवसात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आज मंगळवार दि. १८ ते शनिवार दि. २२ मार्च दरम्यानच्या पाच दिवसात खालीलप्रमाणे भागपरत्वे दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरणासहित अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची (Light Rain) शक्यता जाणवते. पावसापेक्षा विजा, वारा व गडगडाटीच्या वातावरणाची शक्यता जाणवते. 

मध्य महाराष्ट्रातील खांदेश ते कोल्हापूर सोलापूर जिल्हयापर्यंतच्या (Maharashtra Weather Update) दहा जिल्ह्यात आज मंगळवार दि. १८ ते गुरुवार दि. २० मार्च दरम्यानचे तीन दिवस तर मराठवड्यातील आठ जिल्ह्यात आज मंगळवार दि. १८ ते शुक्रवार दि. २१ मार्च दरम्यानचे चार दिवस व विदर्भातील अकरा जिल्ह्यात शुक्रवार व शनिवार दि. २१- २२ मार्च दरम्यानचे दोन दिवस या अवकाळी वातावरणाचा (Cloudy Weather) परिणाम जाणवेल, असे वाटते.              विशेषतः मराठवाडा, विदर्भ व जळगांव, दक्षिण नगर, सातारा, सांगली, सोलापूर ह्या जिल्ह्यात शुक्रवार दि. २१ मार्च ला या वातावरणाचा प्रभाव अधिक जाणवेल असे वाटते. 

दरम्यानच्या पाच दिवसात कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात दिवसाच्या दुपारच्या कमाल तापमानात काहीशी घट होवून तापमान सध्यापेक्षा २-३ डिग्रीने खालवेल, असे वाटते. 

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd)IMD Pune

टॅग्स :हवामान अंदाजशेती क्षेत्रपाऊसतापमानमहाराष्ट्र