Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain Update : 23 सप्टेंबरपासून मान्सून परतण्याची शक्यता, वाचा कुठे-कुठे पाऊस पडणार? 

Maharashtra Rain Update : 23 सप्टेंबरपासून मान्सून परतण्याची शक्यता, वाचा कुठे-कुठे पाऊस पडणार? 

Latest News Maharashtra Rain Update Monsoon return from September 23 these district rain | Maharashtra Rain Update : 23 सप्टेंबरपासून मान्सून परतण्याची शक्यता, वाचा कुठे-कुठे पाऊस पडणार? 

Maharashtra Rain Update : 23 सप्टेंबरपासून मान्सून परतण्याची शक्यता, वाचा कुठे-कुठे पाऊस पडणार? 

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होणार असून काही भागात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होणार असून काही भागात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain Update :  राज्यात पुन्हा पावसाचे (Rain Update) आगमन होणार असून काही भागात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार २३ सप्टेंबरपासून पावसाचे दमदार कमबॅक होणार आहे. 


परतीचा पाऊस -
                 
अति वायव्य राजस्थान, व कच्छ परिसरातून वायव्यई वारा, खालावणारी आर्द्रता व इतर काही वातावरणीय बदलानुसार,सोमवार दि. २३ सप्टेंबरपासून मान्सून परतण्याची शक्यता जाणवते. मान्सूनने जरी तोंड फिरवले तरी इतर काही वातावरणीय घडामोडीतून तो सुरवातीचे काही दिवस जागेवरच खिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 
               
मध्यम पाऊस -
                     
सप्टेंबर २१ ते २४ च्या दुसऱ्या आवर्तनातील पावसाची सुरवात प्रथमत: विदर्भात जोरदारपणे व त्यानंतर मराठवाड्यात मध्यम तीव्रतेने तर मुंबईसह कोकण, खान्देश व नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ हलक्या पावसाने सुरवात होण्याची शक्यता जाणवते. 
            
जोरदार पाऊस -
                
सप्टेंबर २६ ते २९ दरम्यानच्या च्या तिसऱ्या आवर्तनातील चार दिवसात मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, उत्तर नगर, धुळे, जळगांव ,छ सं नगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यात जोरदार अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते. तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता जाणवते. 
            
अतिजोरदार पाऊस -
                 
त्यातही २६, २७ ला खान्देश, नाशिक, छ.संभाजीनगर व सभोंवतलातील परिसरात व २८, २९ ला मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.          

पूर- पाणी -
                 
याचं चार (२६ ते २९) दिवसात नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा व धरण क्षेत्रात होणाऱ्या जोरदार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील नद्यांना पुन्हा पूर- पाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आजपासुन पाच दिवस शक्य तेवढ्या शेतमशागती व खरीप पीक काढणी कामाचा उरक व्हावा, असेही वाटते. 


- माणिकराव खुळे 
Meteorologist ( Retd )
IMD Pune.

Web Title: Latest News Maharashtra Rain Update Monsoon return from September 23 these district rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.