Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain Update : पुढील चार दिवस महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : पुढील चार दिवस महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर 

Latest news Maharashtra rain update Monsoon strength will decrease for four days in Maharashtra Know in detail  | Maharashtra Rain Update : पुढील चार दिवस महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : पुढील चार दिवस महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : पुढील चार दिवसात महाराष्ट्रात पाऊस कुठे, कसा होणार आहे? हे जाणून घेऊयात..

Maharashtra Rain Update : पुढील चार दिवसात महाराष्ट्रात पाऊस कुठे, कसा होणार आहे? हे जाणून घेऊयात..

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain Update : उद्या रविवार दि. २८ ते ३१ जुलै पर्यंतच्या चार दिवसात संपूर्ण मराठवाडा तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा  १५ जिल्ह्यात जोरदार तीव्रतेच्या पावसाची शक्यता (Rain) कमी होवून केवळ मध्यमच पावसाची शक्यता ह्या जिल्ह्यात जाणवते. गुरुवार दि.१ ऑगस्टपासून  मात्र पुन्हा जोरदार पावसाची शक्यता मात्र ह्या जिल्ह्यात जाणवते. मराठवाड्यातील (Marathwada Rain) ८ जिल्ह्यात तर केवळ मध्यम पावसाची शक्यता (Maharashtra Rain Update) आठवडाभर म्हणजे शनिवार दि. ३ ऑगस्टपर्यंतही टिकून राहू शकते, असे जाणवते. 
                
छ.संभाजीनगर, जालना, हिंगोली या ३ जिल्ह्यात तर सध्या पेरपिके जरी ठिक वाटत असली तरी जोरदार अशा पावसाची या जिल्ह्यात अजूनही फार मोठी प्रतिक्षा आहे. ऑगस्ट मधील मान्सूनचे वर्तनच येथील भवितव्य ठरवेल, असे वाटते. नंदुरबार, धुळे, जळगांवसहित संपूर्ण विदर्भातील अशा एकूण १४ जिल्ह्यात उद्यापासून आठवडाभर म्हणजे शनिवार दि. ३ ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मात्र कायम जाणवते. मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात  अतिजोरदार पावसाच्या शक्यतेला अजुन वातावरणीय उतरतीचा धक्का लागलेला नसून अजुन ही शक्यता अजुन किती दिवस आहे हे येणारा काळच उत्तर देईल. 

मराठवाड्यातील जायकवाडी व इतर लघु-प्रकल्पातील धरणे वगळता ह्या आठवड्यात जलआवकेच्या सातत्यातून महाराष्ट्रातील सर्व धरणात जलसंवर्धनातून जलसाठा वाढीची टक्केवारी शतकाकडे झेपावत आहे,  काही ठिकाणी धरणे तरओसंडून वाहत आहे.आणि जुलैत आतापर्यंत तीन आठवडे ओढ दिलेल्या मान्सूनने जुलै अखेरात महाराष्ट्रासाठी ह्यावर्षी आपल्या वर्तनातून वेगळेच असे हे वैशिष्ठ दाखवून दिले आहे. 

काही भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा

धरणे जरी ओसंडत असले तरी, मराठवाड्यातील लघु प्रकल्प व जायकवाडीत समाधानकारक साठा करणाऱ्या, तसेच महाराष्ट्रातील शेतजमिनीची पूर्णपणे भूक शमवणाऱ्या व विहीरींना पाणी-पाझर फोडणाऱ्या जोरदार पावसाची संपूर्ण महाराष्ट्राला अजूनही प्रतिक्षा ही आहेच. कदाचित शेतकऱ्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत ह्यासाठी वाट पहावी लागू शकते, असेच सध्या तरी वाटते. यासाठी ऑगस्ट महिन्यातील मान्सूनचे वर्तन महत्वाचे समजावे. 

- माणिकराव खुळे 

Meteorologist ( Retd)
IMD Pune.

Web Title: Latest news Maharashtra rain update Monsoon strength will decrease for four days in Maharashtra Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.