Join us

Maharashtra Rain Update : कुठे ओसरणार तर कुठे बरसणार? राज्यातील पुढील चार दिवसाच्या पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 20:56 IST

Maharashtra Rain Update : मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ, खान्देश तसेच नाशिक व नांदेड अशा २३ जिल्ह्यात, सध्या चालु असलेल्या पावसाचा जोर असाच राहू शकतो.

Maharashtra Rain Update : उद्या मंगळवार दि. २७ ते शुक्रवार दि. ३० ऑगस्टपर्यंतच्या चार दिवसात, नांदेड वगळता मराठवाडा, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा  १३ जिल्ह्यात हळूहळू पावसाचा जोर कमी होवून दुपारी ३ वाजेच्या कमाल तापमान वाढ व हळूहळू उन्हाची ताप वाढण्याची शक्यता जाणवते. वरील १३ जिल्ह्यात दुपारनंतर सायंकाळी झालाच तर तुरळक ठिकाणी केवळ गडगडाटी स्वरूपातील मध्यम पावसाची शक्यता असु शकते. 

मात्र, दरम्यानच्या चार दिवसात, मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ, खान्देश तसेच नाशिक व नांदेड अशा २३ जिल्ह्यात, सध्या चालु असलेल्या पावसाचा जोर असाच राहू शकतो. त्यामुळे कोकण व घाटमाथ्यावरील पावसाचे सातत्य पाहता रविवार दि. २५ ऑगस्टपासून सह्याद्री कुशीतील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून होत असलेला जलविसर्ग असाच टिकून राहू शकतो. त्यामुळे संबंधित नद्यांच्या काठावर पूर-परिस्थितीची शक्यता ही कायम आहे.              शनिवार दि.३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यतच्या सहा दिवसात संपूर्ण विदर्भ, खान्देश, नाशिक व मुंबई अशा १६ जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस जोर पकडण्याची शक्यता जाणवते. 

 - माणिकराव खुळे Meteorologist (Retd)IMD Pune.

टॅग्स :पाऊसशेती क्षेत्रशेतीहवामान