Join us

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पाऊस, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 4:05 PM

Maharashtra Rain Update : 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update : एकीकडे पावसाने (Rain) महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर देखील 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता हवामान शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे. 

ऑक्टोंबर च्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर (Rain Update) मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. ऑक्टोंबरचा हा शेवटचा आठवडा असून या आठवड्यात 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या तीन दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे. 

https://x.com/Hosalikar_KS/status/1850451052128084005

यात 29 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे, त्यानुसार या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. 

तर 30 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यात कोणताही अलर्ट नाही. तसेच 31 ऑक्टोबर रोजी केवळ विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यात देण्यात आला असून इतर जिल्ह्यात कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. 

टॅग्स :पाऊसशेती क्षेत्रहवामानमहाराष्ट्रमोसमी पाऊस