Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain Update : पावसाबाबत महत्वाचे! महाराष्ट्रात 'या' तारखेपासून पावसाची उघडीप, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : पावसाबाबत महत्वाचे! महाराष्ट्रात 'या' तारखेपासून पावसाची उघडीप, वाचा सविस्तर 

Latest News Maharashtra Rain Update Rains will stop in Maharashtra from '24' October, read in detail | Maharashtra Rain Update : पावसाबाबत महत्वाचे! महाराष्ट्रात 'या' तारखेपासून पावसाची उघडीप, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : पावसाबाबत महत्वाचे! महाराष्ट्रात 'या' तारखेपासून पावसाची उघडीप, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : पावसाबाबत महत्वाची अपडेट समोर आली असून येत्या गुरुवारपासून पावसाची (Rain Update) उघडीप होणार आहे.

Maharashtra Rain Update : पावसाबाबत महत्वाची अपडेट समोर आली असून येत्या गुरुवारपासून पावसाची (Rain Update) उघडीप होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain Update : पावसाबाबत महत्वाची अपडेट समोर आली असून येत्या गुरुवार म्हणजेच २४ ऑक्टोबरपासून पावसाची (Rain Update) उघडीप होणार आहे. तर आज आणि उद्या मुंबईत पाऊस बरसणार असून तर २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान फक्त द. महाराष्ट्रात ४ दिवस किरकोळ पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे चक्रीवादळाचा (Cylone) महाराष्ट्राला धोका  नसल्याचे जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे.         
    
गुरुवार दि.२४ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात पावसाची  (Rain stop) उघडीप मिळू शकते, असे वाटते. परंतु शनिवार दि. २६ ते मंगळवार दि. २९ ऑक्टोबरपर्यंतच्या चार दिवसात दक्षिण अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ...

वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा १८ जिल्ह्यात  ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता जाणवते. मुंबईत मात्र आज व उद्या (२१-२२ ला ) जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. एक नोव्हेंबर नंतर पावसाची पूर्णतः उघडीप मिळू शकते, असे वाटते. 

थायलंडच्या पश्चिम किनारपट्टीसमोर व अंदमान बेटांच्या उत्तरेला, बं. उपसागरात आज तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्राचे, उद्या (२२ ला) तीव्र कमी दाब क्षेत्रात तर परवा (२३ ला) चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता जाणवते. गुरुवार दि.२४ ऑक्टोबरला ओरिसा व पश्चिम बंगाल किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राला या चक्रीवादळापासून कोणताही धोका नाही. हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. 


- माणिकराव खुळे 
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Web Title: Latest News Maharashtra Rain Update Rains will stop in Maharashtra from '24' October, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.