Maharashtra Weather Update : फिंजल चक्रीवादळाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील महाराष्ट्रातील थंडी (Cold Weather) घालवल्यानंतर, पुन्हा उत्तर भारतात, मार्गस्थ होत असलेले पश्चिमी (झंजावात) प्रकोप व समुद्र सपाटीपासून साडेबारा किमी. उंचीवर वाहणारे उच्च तपांबरातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांचे झोता (जेट स्ट्रीम) मुळे महाराष्ट्रात थंडीचे महाराष्ट्रात संकष्टी चतुर्थीपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता, वाचा सविस्तर कमबॅक होण्याचा अंदाज जेष्ठ निवृत्त हवामान शास्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
त्यानुसार आजपासून खान्देश, नाशिकपासून (Nashik Temperature) थंडीत हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दि. १८ डिसेंबर (संकष्टी चतुर्थी) पर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता जाणवते. विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने म्हणजे मंगळवार दि. १० डिसेंबरनंतर जाणवेल असे वाटते.
पाऊस-
विदर्भ वगळता महाराष्ट्रात सध्या तरी पावसाची शक्यता जाणवत नाही. विदर्भातही आज व उद्याच तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. परवा, मंगळवार दि. १० डिसेंबरनंतर तेथेही वातावरण निवळेल.
या १० दिवसातील तापमाने -
या दहा दिवसातील पहाटे ५ चे किमान व दुपारी ३ चे कमाल अशी दोन्हीही तापमाने घसरून, सरासरी इतकी म्हणजे, भागपरत्वे किमान १० ते १२ तर कमाल २८ ते ३० डिग्री से. ग्रेड दरम्यान राहण्याची शक्यता जाणवते.
शेतपिकांची काळजी व उर्वरित डिसेंबरातील थंडी -
थंडीसाठी, सध्याचे १० दिवस सुरक्षित जाणवतात. शेतकऱ्यांनी, रब्बी पिकांचे सिंचन, तणनियंत्रण व खत नियोजन यांचा मेळ घालून पीक वाढीचा वेग-दर साधावा व या १० दिवसाच्या थंडीचा लाभ उठवावा, असे वाटते.
कारण डिसेंबरातील थंडीच्या मासिक अंदाजनुसार, शेवटच्या आठवड्यात कमाल व किमान अशी दोन्हीही तापमाने, सरासरीपेक्षा अधिक राहून, थंडी सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे. शिवाय पूर्व प्रशांत महासागरात ' ला-निना अजूनही अवतरलेला नाही. त्यामुळे थंडीच्या लाटांचाही कमी राहील, असे वाटते. अर्थात दरम्यानच्या कालावधीत, वातावरणात काही बदल झाल्यास, अवगत केले जाईल.
- माणिकराव खुळे.
Meteorologist (Retd)
IMD Pune.